• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. from inzamam ul haq to prithvi shaw cricketers have argument with people look who they are vbm

Cricketers Controversy: इंझमाम उल हकपासून ते पृथ्वी शॉपर्यंत ‘या’ क्रिकेटपटूंनी लोकांशी घेतलाय पंगा, पाहा कोण आहेत?

Prithvi Shaw Controversy: पृथ्वी शॉ हा क्रिकेटविश्वातील एकमेव क्रिकेटपटू नाही, जो चाहत्यांशी किंवा लोकांशी भिडला आहे. जाणून घेऊया इतर कोण-कोणत्या क्रिकेटरनी चाहत्यांशी आणि लोकांशी पंगा घेतला आहे.

February 21, 2023 19:26 IST
Follow Us
  • Cricketers Controversy
    1/9

    भारतीय संघाचा स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या वादात सापडला आहे. पृथ्वी शॉने पंचतारांकित हॉटेलमध्ये सेल्फी न दिल्याने काही लोकांनी कारवर हल्ला केल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे दिली आहे. (फोटो- सौजन्य इंस्टाग्राम)

  • 2/9

    ओशिवरा पोलिसांनी सपनाला अटक करून तिला ताब्यात घेतले. पृथ्वी शॉने हे प्रकरण शांत करण्यासाठी सपना आणि तिच्या सहकाऱ्यांनी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोपही केला. (फोटो- सौजन्य इंस्टाग्राम)

  • 3/9

    पृथ्वी शॉ आणि सपना गिलचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दोघेही भांडताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉच्या हातात एक काठी दिसत आहे. (फोटो- सौजन्य इंस्टाग्राम)

  • 4/9

    सपना गिलला जामीन मिळाल्यानंतर तिने मुंबई विमानतळ पोलिस स्थानकात क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. (फोटो- सौजन्य इंस्टाग्राम)

  • 5/9

    इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स हा देखील वादांसाठी ओळखला जातो. त्याने अनेकवेळा चाहत्यांशी पंगा घेतला आहे. २०१७ मध्ये, बेन स्टोक्सने ब्रिस्टलमधील नाईट क्लबमध्ये एका व्यक्तीवर पंचांचा वर्षाव केला होता. (फोटो- सौजन्य ट्विटर)

  • 6/9

    चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या फायनलमध्ये भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. दरम्यान, एक पाकिस्तानी चाहता सतत ओरडत होता ‘बाप कौन है’, ज्यावर शमीने आपला संयम गमावला आणि त्या प्रेक्षकावर भडकला होता. (फोटो- सौजन्य ट्विटर)

  • 7/9

    पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकच्या क्रिकेटच्या दिवसातील सर्वात मोठी समस्या म्हणजे तो लठ्ठ होता. त्यामुळे प्रेक्षक त्याची खिल्ली उडवायचे. (फोटो- सौजन्य ट्विटर)

  • 8/9

    याच्याशी संबंधित एक प्रसिद्ध घटना आहे, जेव्हा इंझमामला ‘बटाटा’ म्हटल्यावर राग आला आणि तो सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये आला. ही घटना सप्टेंबर १९९७ ची आहे, जेव्हा टोरंटो, कॅनडात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहारा कप एकदिवसीय सामना खेळला जात होता. (फोटो- सौजन्य ट्विटर)

  • 9/9

    हसन अली स्थानिक क्रिकेट टूर्नामेंट खेळण्यासाठी गेला होता, तिथे ट्रोलर्सनी त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हसन अली स्टँडमधील ट्रोलर्सना मारहाण करण्यासाठी धावला होता. (फोटो- सौजन्य ट्विटर)

TOPICS
क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsपृथ्वी शॉPrithvi Shawबेन्स स्टोक्सBen Stokes

Web Title: From inzamam ul haq to prithvi shaw cricketers have argument with people look who they are vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.