-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहितने आपल्या डावातील २२वी धाव पूर्ण करताच एक विक्रम केला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७००० धावा पूर्ण केल्या. (फोटो-ट्विटर)
-
हा मोठा विक्रम करण्यासाठी रोहित शर्माने ४३८ सामन्यांच्या ४५७ डाव खेळले. त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत त्याने ४३ शतके आणि ९१ अर्धशतकेही केली आहेत. (फोटो-ट्विटर)
-
भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ७८२ डावांमध्ये ३४३५७ धावा केल्या आहेत. (फोटो-ट्विटर)
-
विराट कोहली भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. या फलंदाजाने ४९३ सामन्यांच्या ५५१ डावांमध्ये २५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. (फोटो-ट्विटर)
-
राहुल द्रविड तिसऱ्या क्रमांकावर आहे. द्रविडने २४२०८ धावा केल्या आहेत. (फोटो-ट्विटर)
-
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. सौरव गांगुलीच्या नावावर १८५७५ धावा आहेत. (फोटो-ट्विटर)
-
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७२६६ धावा केल्या. धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. (फोटो-ट्विटर)
-
माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या नावावर १७२५३ आंतरराष्ट्रीय धावा आहेत. तो सातव्या क्रमांकावर आहे. (फोटो-ट्विटर)
-
सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७०१४धावा केल्या आहेत. तो भारताचा सातवा फलंदाज ठरला आहे. (फोटो-ट्विटर)
PHOTOS: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सतरा हजार धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा सातवा भारतीय, पाहा इतर खेळाडूंची यादी
IND vs AUS 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटी सामन्यात रोहित शर्माने १७००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. त्याच्या अगोदर हा कारनामा कोणत्या भारतीयांनी केला आहे, घ्या जाणून
Web Title: Rohit sharma became the seventh indian to complete 17000 runs in international cricket six ahead of him vbm