• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. master blaster sachin tendulkar with wife anjali visited tadoba gave gifts bags books school uniforms to students nagpur photos rsj 74 sdn

Photos: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची वचनपूर्ती! ताडोबातल्या शाळकरी मुलांना दिलं ‘हे’ स्पेशल गिफ्ट

सचिन दोन महिन्यांपूर्वी २१ फेब्रुवारी रोजी पत्नी अंजली व मित्रांसमवेत ताडोबात व्याघ्र सफारीसाठी आला असता अलीझंझा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली होती.

Updated: May 6, 2023 10:10 IST
Follow Us
  • Sachin Tendulkar Tadoba Gifts For Students
    1/21

    एखाद्याला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यास अनेकजण कामाच्या व्यापात विसरून जातात.

  • 2/21

    सेलिब्रेटीच्या बाबतीत हा प्रकार नेहमीच होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे.

  • 3/21

    मात्र ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलीझंझा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके आणि स्कूल बॅग भेट स्वरूपात देण्याचे अभिवचन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व पत्नी अंजली यांनी दिले होते.

  • 4/21

    दोन महिन्यानंतर ताडोबातील अलीझंझा शाळेला आठवणीने भेट देताना तेंडुलकर दाम्पत्याने दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे.

  • 5/21

    आपल्या आवडत्या क्रिकेटपटूकडून ही भेट स्वीकारताना शाळेचे विद्यार्थी देखील गहिवरले.

  • 6/21

    हा भावनिक प्रसंग आज ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलीझंझा शाळेत उपस्थित असलेल्या सर्वांनी याची देही याची डोळा अनुभवला.

  • 7/21

    मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दोन महिन्यांपूर्वी २१ फेब्रुवारी रोजी पत्नी अंजली व मित्रांसमवेत ताडोबात व्याघ्र सफारीसाठी आला असता अलीझंझा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली होती.

  • 8/21

    तेव्हा विद्यार्थ्यांनी चौथ्या वर्गाच्या मराठीच्या पुस्तकात असलेला कोलाज नावाचा धडा सचिनची बायोग्राफी वाचून दाखवली होती.

  • 9/21

    स्वत:ची बायोग्राफी विद्यार्थी वाचत असताना सचिन भावूक झाला होता.

  • 10/21

    तेव्हा सचिनची पत्नी डॉ. अंजली हिने शाळेतील विद्यार्थांना गणवेश, स्कूल बॅग देण्याचे कबूल केले होते.

  • 11/21

    विद्यार्थ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने शुक्रवारी दुपारी ३ वाजता अलीझंझाच्या जि. प. शाळेत सचिन व पत्नी डॉ. अंजली व मित्र यांनी दोन महिन्यानंतर भेट देत विद्यार्थ्यास स्कूल बॅग दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

  • 12/21

    सचिन विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी येणार असल्याने विद्यार्थी व शिक्षकाने शाळेत रांगोळी व फुलांनी सजवली होती.

  • 13/21

    सचिन शाळेत येताच शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षिका मनीषा बावणकर यांनी पारंपरिक पद्धतीने लाकडी पाटावर पाय धुतले व औक्षवण करत पुष्पगुच्छ दिले.

  • 14/21

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून अलीझंझा गाव आहे. गावाची लोकसंख्या ३०० च्या घरात आहे.

  • 15/21

    गेटकडे जाण्याच्या मार्गावर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे.

  • 16/21

    या शाळेत सध्या सतरा विद्यार्थी आहेत. फेब्रुवारी महिन्यात याच मार्गाने सफारीला जाताना विद्यार्थी खेळताना सचिनला दिसले. त्यांनी गाडी थांबवून शाळेला भेट दिली होती.

  • 17/21

    दरम्यान, विद्यार्थ्यांनी सचिनच्या जीवन चरित्रावर आधारित चौथ्या वर्गाच्या मराठीच्या पुस्तकात असलेला कोलाज नावाचा धडा वाचून दाखवला होता.

  • 18/21

    शुक्रवारी याची आठवण करत सचिनने पुन्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्कूल बॅग व साहित्य भेट दिली.

  • 19/21

    बॅग मध्ये काही साहित्य आहे बॅग आणि साहित्याचा वापर शाळेसाठी करा बरोबर करा असे सांगत खूप शिका असे बोलले.

  • 20/21

    लगेच पंधरा मिनिटानी अलीझंझा गेटमधून सफारीला निघाले. दरम्यान. जि. प. प्राथमिक शाळेने छोटेखानी कार्यक्रम ठेवला होता.

  • 21/21

    प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रमेश बदके, संचालन देविदास बावणकर, शिक्षिका मनीषा बावनकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर चौखे, सरपंच गजानन वाकडे, मुख्याध्यापक अशोक कामडी, ग्रा. प. सदस्या सुनीता नन्नावरे, शाळा व्यवस्थापक समिती सदस्या वैशाली नागोसे, विशेष शिक्षक रवींद्र उरकुडे, वनरक्षक परमेश्वर अनकाडे आदी उपस्थित होते.

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket Newsक्रीडाSportsनागपूरNagpurमराठी बातम्याMarathi News

Web Title: Master blaster sachin tendulkar with wife anjali visited tadoba gave gifts bags books school uniforms to students nagpur photos rsj 74 sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.