-
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान आणि इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यातील तुलनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. इशांतने झहीर खानचे कौतुक करत तो इंग्लंडच्या जेम्स अँडरसनपेक्षा सरस असल्याचे सांगितले. संग्रहित छायाचित्र (ट्वीटर)
-
‘बीयरबाइसेप्स’ यु ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत इशांत शर्मा म्हणाला, “जेम्स अँडरसनची गोलंदाजीची शैली आणि पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. तो इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीत खेळतो. जर तो भारतात खेळला तर झहीर खान त्याच्यापेक्षा (जेम्स अँडरसन) सरस गोलंदाज असेल.” संग्रहित छायाचित्र (ट्वीटर)
-
इशांत शर्माने २०१४च्या वेलिंग्टन कसोटीत घडलेल्या किस्सा याबद्दल सांगितले. या कसोटीत झहीर खानने इशांतच्या गोलंदाजीवर झेल सोडल्यानंतर तो झहीरवर भडकला होता. संग्रहित छायाचित्र (ट्वीटर)
-
अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. मात्र, “जर तो आशियायी असता तर एवढा मोठा विक्रम करू शकला नसता”, असे त्याने म्हटले. संग्रहित छायाचित्र (ट्वीटर)
-
इशांत शर्माने सांगितले की, झहीर खान त्याचा गुरू आहे आणि त्याने कधीही झेल सोडल्याबद्दल कोणाला शिवीगाळ केली नाही. फक्त तो त्याच्यावर भडकलो होता. कारण, सामना निर्णायक वळणावर होता. संग्रहित छायाचित्र (ट्वीटर)
-
“आजही लोकांना कळत नाही की मी हे कोणाला म्हटलंय. मी कधीही कोणत्याही खेळाडूला झेल सोडल्याबद्दल शिवीगाळ केली नाही. जॅकला (झहीर खान) कसं सांगू, तो माझा गुरु आहे नी गुरूला शिव्या कोणी देईल का?” असेही तो पुढे म्हणाला. संग्रहित छायाचित्र (ट्वीटर)
-
माही भाईची ताकद एक नाही तर अनेक आहेत. तो शांत नाही पण त्याची विचार करण्याची क्षमता ही इतरांपेक्षा खूप जास्त आहे, तो मस्तीखोर नाही. धोनीचे पाय अजूनही जमिनीवर आहे. संग्रहित छायाचित्र (ट्वीटर)
-
मी ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनाच मी चिडवतो आणि शिव्या देतो. नाहीतर मी सगळ्यांना चिडवत नाही. त्यावर इशांत म्हणाला की, “मला माहित नाही पण तू माझा खरं मोठा भाऊ आहे.” संग्रहित छायाचित्र (ट्वीटर)
-
“मी त्याच्या धाकट्या भावासारखा असून तो नेहमी माझ्याशी चांगलाच वागला आहे. कधी कधी चिडला पण त्याच्या मनात काहीही नसते.” पुढे त्या मुलाखतीत म्हणाला. संग्रहित छायाचित्र (ट्वीटर)
Ishant Sharma: इशांत शर्माने एका मुलाखतीत झहीर, धोनी आणि अँडरसन यांच्या संदर्भात केले मोठे विधान, जाणून घ्या
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान, कर्णधार धोनी आणि इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन बाबतीत काही मोठे खुलासे केले आहेत.
Web Title: Ishant sharma ishant sharma makes big statement regarding zaheer dhoni and anderson in an interview avw