-
३६ वर्षीय आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये आठव्यांदा १० बळी घेतले. अशाप्रकारे त्याने भारताचा माजी लेगस्पिनर अनिल कुंबळेची बरोबरी केली आहे. (फोटो सौजन्य- ट्विटर)
-
रविचंद्रन अश्विनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०९ विकेट्स आहेत. तो आता अनिल कुंबळेनंतर (९५३) सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. (फोटो सौजन्य- ट्विटर)
-
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही डावात पाच बळी घेणारा रविचंद्रन अश्विन भारताचा पहिला गोलंदाज ठरला. त्याच्या अगोदर हा कारनामा कोणालाही करता आला नाही. (फोटो सौजन्य- ट्विटर)
-
अश्विन कसोटीत सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. या प्रकरणात त्यानी हरभजन सिंगला (५ वेळा) मागे टाकले आहे. (फोटो सौजन्य- ट्विटर)
-
कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा १२ किंवा त्याहून अधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत सहाव्यांदा अशी कामगिरी करून श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथय्या मुरलीधरनची बरोबरी केली. (फोटो सौजन्य- ट्विटर)
-
आर अश्विनने सामन्यात १५६ धावांत १२ बळी घेतले. विंडीजमधील कोणत्याही परदेशी फिरकीपटूची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. (फोटो सौजन्य- ट्विटर)
-
आर अश्विनने पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात ७ बळी घेतले. अश्विनने दोन्ही डावात पाच विकेट्स घेण्याचा ३४व्यांदा असा पराक्रम केला आणि रंगना हेराथची बरोबरी केली. (फोटो सौजन्य- ट्विटर)
-
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये आर.अश्विनने सहाव्यांदा पाच विकेट्स घेऊन माल्कम मार्शलची बरोबरी केली. यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत माल्कम मार्शलने सहा वेळा पाच बळी घेतले होते. (फोटो सौजन्य- ट्विटर)
-
आतापर्यंत ९३ कसोटी खेळताना अश्विनने एका कसोटी सामन्यात ६ वेळा १२ किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. याआधी मुरलीधरनने १३३ कसोटी सामन्यांमध्ये अशी कामगिरी केली होती. (फोटो सौजन्य- ट्विटर)
PHOTOS: रविचंद्रन आश्विनचा वेस्ट इंडिजविरुद्ध कहर! १२ विकेट्स घेत लावली विक्रमांची रांग
R Ashwin Records: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना भारतीय संघाने मोठ्या फरकाने जिंकला. या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि १४१ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात आर आश्विने १२ विकेट्स मोलाची भूमिका निभावली.
Web Title: Ind vs wi 1st test r ashwin takes 12 wickets against west indies and made many records in his name vbm