-
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एकदिवसीय विश्वचषकात शानदार गोलंदाजी केली. मोहम्मद शमीने सात सामन्यात २४ विकेट्स घेत स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.
-
मोहम्मद शमी क्रिकेटच्या मैदानावर जितका हिट आहे, तितकाच तो क्रिकेटच्या मैदानाबाहेरही आलिशान जीवन जगतो. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील अलीनगर भागात त्यांचे एक आलिशान फार्म हाऊस आहे.
-
हे फार्म हाऊस सुमारे १५० बिघा परिसरात पसरले आहे. त्याने आपल्या फार्म हाऊसचे नाव ‘हसीन’ ठेवले असून त्याची किंमत १५ कोटी रुपये आहे.
-
या ठिकाणी मोहम्मद शमी ब्रेकच्या वेळी सामन्यांचा सराव करतो. त्याला फार्म हाऊसमध्ये वैयक्तिक क्रिकेट खेळपट्टी देखील तयार केला आहे.
-
याशिवाय शांततेत वेळ घालवण्यासाठी तो या फार्म हाऊसवर येतो. येथे एक स्विमिंग पूल देखील आहे, जेथे विश्रांतीसोबतच पोहण्याचा आनंदही घेतो.
-
मोहम्मद शमीने फार्म हाऊसमध्ये काही झाडे लावली आहेत, जी ऑक्सिजन आणि आणि फळेही देतात.
-
त्याने फार्म हाऊसमध्ये आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. त्याच्याकडे टोयोटा फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यू ५ सीरीज आणि ऑडी सारख्या कार आहेत.
-
याशिवाय त्याच्याकडे बाईक्सचेही अप्रतिम कलेक्शन आहे. त्याच्याकडे रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल जीटी ६५० आहे. (Photos Source: @mdshami.11/instagram)
PHOTOS : मोहम्मद शमीचे १५ कोटी रुपयाचे फार्महाऊस आतून किती आहे आलिशान? जाणून घ्या
Mohammad Shami: २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीचे वैयक्तिक आयुष्यही खूपच चमकदार आहे. यूपीच्या अमरोहा जिल्ह्यात त्यांचे एक आलिशान फार्म हाऊस आहे, ज्याची किंमत १५ कोटी रुपये आहे.
Web Title: Mohammad shami see how luxurious mohammad shamis farmhouse is from inside the price is rs 15 crores vbm