• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. cricketer jasprit bumrah and his wife sanjana ganesan celebrate 30th birthday of indian fast bowler kvg

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशनची लव्ह स्टोरी आहे खास; दोघेही एकमेकांना समजत होते गर्विष्ठ

भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह ६ डिसेंबर रोजी ३० वर्षांचा झाला. यानिमित्त त्याची पत्नी संजना गणेशनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत.

December 7, 2023 19:34 IST
Follow Us
  • jaspirt bumrah and sanjana ganesan
    1/9

    जसप्रीत बुमराह आजच्या घडीला भारताचा आघाडीचा बॉलर आहे. तसेच आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा तो आधारस्तंभ असल्याचे मानले जाते. त्यांच्या पत्नीने त्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या. (Sanjana Ganesan Instagram)

  • 2/9

    बुमराह आणि संजना गणेशण २०१९ पासून एकमेकांना डेट करत होते. मार्च २०२१ रोजी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. (Sanjana Ganesan Instagram)

  • 3/9

    यावर्षी आशिया चषक मालिकेसाठी नेपाळला गेल्यानंतर जसप्रीत बुमराहने अचानक मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. नंतर कळले की ४ सप्टेंबर रोजी या जोडप्याच्या घरी बाळाचा जन्म झाला आहे. (Sanjana Ganesan Instagram)

  • 4/9

    जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशनची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपट किंवा वेबसीरिजप्रमाणे आहे. दोघांची भेट झाली तेव्हा बुमराह आयपीएलसाठी खेळत होता, तर संजना स्टार स्पोर्ट्ससाठी अँकरींग करत होती. (Sanjana Ganesan Instagram)

  • 5/9

    दोघांच्या नात्याबाबतची माहिती जेव्हा सार्वजनिक झाली, तेव्हा बुमराहने एका वृत्तवाहिनीला त्यांच्या रिलेशनशिपबद्दलची पूर्ण माहिती दिली. जेव्हा दोघे एकमेकांना पहिल्यांदा भेटले, तेव्हा संजना गर्विष्ठ असल्याचा बुमराहाचा समज झाला होता आणि विशेष म्हणजे संजनालाही बुमराह बद्दल हेच वाटले. (Sanjana Ganesan Instagram)

  • 6/9

    करियरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जसप्रीत बुमराह सध्या सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. भारतीय मैदानाशिवाय दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्येही त्याने आपल्या गोलदांजीने प्रभावित केले असून भारताला विकेट्स मिळवून दिल्या आहेत. (Sanjana Ganesan Instagram)

  • 7/9

    बुमराहने २०१८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघात प्रवेश केला होता. एबी डिव्हिलियर्सच्या रुपात त्याने करियरचा पहिलाच बळी मिळविला. तर पहिल्या कसोटीत एकूण चार बळी घेतले. (Sanjana Ganesan Instagram)

  • 8/9

    जसप्रीत बुमराह हा आशियाई देशामधील सर्वात जलद १०० बळी घेणारा पहिला खेळाडू आहे. बुमराह यांनी केवळ १८ सामन्यात १०० बळीचा आकडा गाठला होता. (Sanjana Ganesan Instagram)

  • 9/9

    हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघात घेतल्यानंतर जपप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्स संघाच्या सोशल मीडिया हँडलला अनफॉलो करण्याची बातमी समोर आली होती. रोहित शर्मा याच्यानंतर बुमराहकडे कर्णधारपद येईल, अशी त्याला अपेक्षा होती, असे काही माध्यमांनी सांगितले. मात्र नेमके कारण समोर येऊ शकले नाही. (Sanjana Ganesan Instagram)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेट न्यूजCricket Newsजसप्रीत बुमराहJasprit Bumrahसोशल मीडियाSocial Media

Web Title: Cricketer jasprit bumrah and his wife sanjana ganesan celebrate 30th birthday of indian fast bowler kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.