-
IPL Cheer Leaders Salary & Selection: २००८ साली आयपीएल सुरु झालं तेव्हापासूनच जागतिक क्रिकेट स्पर्धांच्या तोडीस तोड चर्चा या सामन्यांची असते. आयपीएलची शान जितकी खेळाडूंमुळे वाढली तितकीच या स्पर्धेतील वेगवेगळे प्रयोग सुद्धा आकर्षणाचा मुद्दा ठरतात.
-
आयपीएलला ग्लॅमरची जोड देण्यासाठी २००८ पासूनच चीअर लीडर्सचे डान्स आयोजित केले जातात. हा मुद्दा जितका कौतुकाचा ठरला होता तितकीच यावर टीका सुद्धा झाली. यंदाच्या आयपीएलची चर्चा सुद्धा जोरदार चालू असताना आज आपण चीअर लीडर्सविषयी काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेणार आहोत.
-
चर्चेतील चीअर लीडर्स नेमक्या आल्या कुठून, त्यांची निवड कशी होते आणि मुख्य प्रश्न त्यांना पगार किती मिळतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी माहिती शेवटपर्यंत वाचा
-
तर मंडळी आयपीएलच्या सामन्यातील बहुतांश चीअर लीडर्स या परदेशातून आलेल्या असतात. विशेषतः अमेरिका , इंग्लंड, साऊथ आफ्रिका या देशातील कलाकारांना यासाठी प्राधान्य दिले जाते. या चीअर लीडर्सची निवड बॉलिवूड कास्टिंग एजन्सीतर्फे होते
-
चीअर लीडर म्हणून काम करण्यासाठी त्यांना पद्धतशीर ऑडिशन व परीक्षा द्यावी लागते. मुलाखतीच्या प्रात्यक्षिकांमध्ये त्यांना एक वेगळा डान्स सादर करावा लागतो. यानंतर आयपीएलच्या संघांकडून त्यांना प्रशिक्षण दिले जाते व आणि मग निवड प्रक्रिया पूर्ण होते
-
Who Can Become IPL Cheer Leader: चीअर लीडर होण्यासाठी डान्स व मॉडेलिंग यायला हवं, तसेच पूर्ण सामन्यात स्टॅमिना राखून ठेवावा लागतो म्हणून शारीरिक दृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे
-
या चीअर लीडर्सनी अनेकदा बॉलिवूडसह भारतीय सिनेमांमध्ये काम केलेलं असतं ज्यामुळे त्यांना भारतीय नृत्यशैलीची जाण असते. याशिवाय एरोबिक्स, जिम्नॅस्टिक व पाश्चिमात्य डान्स प्रकारांची थोडीफार सवय असल्यास त्यांना निवडीत प्राधान्य दिले जाते
-
IPL Cheer Leaders Salary: मीडिया रिपोर्टनुसार, प्रत्येक संघाच्या मालकांकडून चीअर लीडर्सचा पगार व राहण्याची, खाण्याची सोय केली जाते. साधारण एका सामन्यासाठी त्यांना १४ ते २५ हजार रुपये मानधन दिले जाते. त्यातही जर टी मॅच त्यांचा संघ जिंकला तर बोनसही दिला जातो. संघानुसार ही रक्कम बदलू शकते
-
मात्र यापूर्वी अनेकदा चीअर लीडर्स पगार वेळेवर मिळत नाही किंवा फाईव्ह स्टारमध्ये राहण्याची सोय करतो सांगून संघाकडून साध्या व अस्वच्छ हॉटेल रूम बुक केल्या जातात अशाही तक्रारी समोर आल्या आहेत. (सर्व फोटो: प्रातिनिधिक/X/लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
IPL चं ग्लॅमर वाढवणाऱ्या चीअर लीडर्सना एका सामन्यासाठी किती पगार मिळतो? सोयी- सुविधांची यादी पाहा
IPL Cheerleaders Salary per Match: आयपीएलच्या सामन्यात प्रत्येक संघाच्या चीअर लीडर्सना वेगवेगळा पगार मिळतो. संघ जिंकल्यावर या नृत्यांगनांना बोनसही देतो, याशिवाय आयपीएल फ्रँचाइजी त्यांची कशी सोय करतात याचा एक अंदाज ..
Web Title: Ipl 2024 mumbai indians to kkr gt how much salary teams pay to cheer leaders auditions criteria benefits expenditures list svs