-
बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला नुकत्याच झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात १२ लाख रुपयांचा दंड आकारला आहे.
-
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने केकेआरचा दोन विकेट्सच्या फरकाने पराभव केला. जोस बटलरच्या दमदार कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्सने या सामन्यात बाजी मारली. जोस बटलर फक्त ६० चेंडूत नाबाद राहून १०७ धावा केल्या.
-
या सामन्यानंतर बीसीसीआयने श्रेयस अय्यरवर दंडाची घोषणा केली.
-
बीसीसीआयच्या नियमांनुसार ‘स्लो ओव्हर रेट’च्या गुन्ह्यांसाठी श्रेयस अय्यरला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
-
यंदाच्या आयपीएल हंगामात केकेआर संघाचा सहा सामन्यांमधून फक्त दोन वेळा पराभव झाला तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने मात्र शानदार विजयासह सात सामन्यांमधून सहा विजय नोंदवले आहेत.
-
बीसीसीआयकडून आयपीएलमध्ये सर्व संघांना आवश्यक ओव्हर-रेट राखण्यासह आयपीएलच्या नियमांचे पालन करण्यासाठी अनेक नियम करण्यात आले आहे त्या नियमाअंतर्गत श्रेयश अय्यरला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
-
बीसीसीआयने आयपीएलमध्ये सामन्यांचे सुरळीत आचरण सुनिश्चित करण्यासाठी आणि सामन्यांचे नियोजित वेळेचे पालन करण्यासाठी या नियमांचे अंमलबजावणी केली आहे.
-
हा दंड फक्त मैदानावरील शिस्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि आयपीएलच्या मानकांचे पालन करण्यासाठी आहे तर यामध्ये अयशस्वी झाल्यास त्याचे परिणाम संघ आणि त्या प्रत्येक संघाच्या कर्णधाराला भोगावा लागतो.
(सर्व फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट)
IPL 2024: केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरला १२ लाखांचा दंड; बीसीसीआयने का केली कारवाई?
बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला नुकत्याच झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात १२ लाख रुपयांचा दंड आकारला आहे. जाणून घ्या या बाबत सविस्तर माहिती.
Web Title: Ipl 2024 kkr captain shreyas iyer fined rs 12 lakh lets know why did bcci take this action arg 02