-
युजवेंद्र चहलने आयपीएलमध्ये २०० बळी पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. या यादीत ड्वेन ब्राव्हो दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर १८३ विकेट्स आहेत.
-
चहलने भारतात खेळल्या गेलेल्या १२५ आयपीएल सामन्यांमध्ये १५८ विकेट घेतल्या आहेत. भारतात खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यांमध्ये फक्त भुवनेश्वर कुमारने चहलपेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. भुवीच्या नावावर भारताकडून आयपीएलमध्ये १६० विकेट्स आहेत. चहलने यूएईमध्ये ४२ विकेट घेतल्या आहेत. येथे त्याने जसप्रीत बुमराहची बरोबरी केली आहे.
-
चहलने आयपीएलमध्ये सात वेळा एका डावात चार किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत तो लसिथ मलिंगासोबत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. सुनील नारायण ८ डावांसह पहिल्या स्थानावर आहे.
-
युजीने आयपीएलमध्ये २० वेळा एका डावात तीन किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत फक्त जसप्रीत बुमराह त्याच्या पुढे आहे. त्याने आयपीएलमध्ये २२ वेळा एका डावात तीन किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत.
-
चहलसह, आयपीएलमध्ये चार गोलंदाज आहेत, ज्यांनी दोन फ्रँचायझींसाठी ५० किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. पियुष चावला (केकेआर आणि पीबीकेएस), अक्षर पटेल (पीबीकेएस आणि डीसी) आणि राशिद खान (एसआरएच आणि जीटी) यांचा या यादीत समावेश आहे.
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएलमध्ये १०० बळी घेणारा चहल हा एकमेव गोलंदाज आहे. राजस्थान रॉयल्सकडून त्याने ६१ बळी घेतले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत सिद्धार्थ त्रिवेदी ६५ विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे.
-
चहलने डावाच्या मधल्या षटकांमध्ये (७ ते १६) १५२ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत तो आघाडीवर आहे. या यादीत अमित मिश्रा (१३९) दुसऱ्या स्थानावर आहे. (Photo Source- IPL X)
PHOTOS : युजवेंद्र चहलने रचले विक्रमांचे मनोरे! विकेट्सच्या द्विशतकासह केले अनेक रेकॉर्ड
Yuzvendra Chahal : सोमवारी राजस्थानने मुंबईची ९ गडी राखून पराभव केला. या सामन्यात राजस्थानसाठी यशस्वी जैस्वालने अप्रतिम शतक झळकावले तर वेगवान गोलंदाज संदीप शर्माने पाच विकेट्स आपल्या नावावर केल्या. पण अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहलनेही आपले नाव इतिहासात नोंदवले. या ३३ वर्षीय फिरकीपटूने अनेक विक्रम केले.
Web Title: Yuzvendra chahal for rajasthan royals breaks records by taking 200th wicket in ipl against mumbai indians vbm