-
भारत विरुद्ध पाकिस्तान T20 विश्वचषक सामना: ICC T20 विश्वचषक २०२४ ला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात आयर्लंडविरुद्ध शानदार विजयाने केली. दुसरीकडे पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा अमेरिकेविरुद्ध मानहानीकारक पराभव झाला. आता भारत ९ जूनला पाकिस्तानविरुद्ध हायप्रोफाइल सामना खेळणार आहे. (फोटो – सोशल मीडिया)
-
T20 विश्वचषकाच्या इतिहासात हे दोन्ही संघ आठव्यांदा आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तान आणि भारताच्या सामन्यात भारतीय संघाने कायमच वर्चस्व गाजवले आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत झालेल्या ७ सामन्यांपैकी भारताने ६ सामने जिंकले असून पाकिस्तानने केवळ एकच सामना जिंकला आहे. वाचा या ७ सामन्यांचा आढावा. (फोटो – सोशल मीडिया)
-
टी-२० विश्वचषक २००७ – भारताने पाकिस्तानला दोनदा पराभूत केले
२००७ च्या टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोनदा सामना झाला होता. १४ सप्टेंबर २००७ रोजी खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या गट टप्प्यातील सामन्यात भारताने विजय मिळवला. तर २४ सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ धावांनी पराभव करत जेतेपद पटकावले. (फोटो – सोशल मीडिया) -
टी-२० विश्वचषक २०१२ – भारत ८ गडी राखून विजयी
श्रीलंकेत झालेल्या या स्पर्धेत सुपर-८ सामन्यात भारत-पाकिस्तान आमनेसामने आले. या सामन्यात पाकिस्तान संघाने १२८ धावा केल्या. भारताने हे आव्हान दोन विकेट्स गमावून जिंकले. या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने ७८ धावा केल्या. तर लक्ष्मीपती बालाजीने सामन्यात तीन विकेट घेतल्या. (फोटो – सोशल मीडिया) -
टी-२० विश्वचषक २०१४ – भारत ७ गडी राखून विजयी
बांगलादेशातील ढाका येथे झालेल्या या स्पर्धेत दोन्ही देश आमनेसामने होते. या सामन्यात पाकिस्तानने ७ विकेट्स गमावत १३० धावा केल्या होत्या. तर भारताने १८.३ षटकांत तीन विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केले. अमित मिश्राने २ विकेट घेतले. तर विराट कोहलीने नाबाद ३६ धावा केल्या. टी-२० विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा सलग चौथा विजय ठरला. (फोटो – सोशल मीडिया) -
टी-२० विश्वचषक २०१६ – भारत ६ गडी राखून विजयी
भारतात झालेल्या या स्पर्धेत दोन्ही संघ कोलकात्याच्या ईडन गार्डनवर आमनेसामने आले होते. पावसामुळे हा सामना १८ षटकांचा झाला. पाकिस्तानने ५ गड्यांच्या मोबदल्यात ११८ धावा केल्या. भारताने हे आव्हान १५.५ षटकात ४ विकेट गमावून पूर्ण केले. या सामन्यात विराट कोहलीने भारताकडून ५५ धावांची शानदार खेळी केली. (फोटो – सोशल मीडिया) -
टी-२० विश्वचषक २०२१ – भारताचा पहिला पराभव
२०२१ मध्ये यूएईमध्ये वर्ल्डकपचे सामने आयोजित करण्यात आले होते. सलग पाच पराभवांचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने इतिहास बदलला. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने भारताविरुद्ध प्रथमच विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ गड्यांच्या मोबदल्यात १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने एकही विकेट न गमावता सामना जिंकला. (फोटो – सोशल मीडिया) -
टी-२० विश्वचषक २०२२ – भारताने पराभवाचा बदला घेतला
२०२२ साली ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० वर्ल्डमध्ये भारताने २०२१ मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला. २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा केल्या होत्या. भारताने २० षटकांत ६ गडी गमावून हे आव्हान पूर्ण केले. विराट कोहलीच्या नाबाद ८२ धावांच्या जोरावर भारताने चार विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी ३ विकेट घेतले. (फोटो – सोशल मीडिया)
T20 WC 2024: भारताने पाकिस्तानवर वर्ल्डकपमध्ये ६ वेळा मिळवला रोमहर्षक विजय, वाचा दोन्ही संघांचा रेकॉर्ड
India vs Pakistan T20 World Cup match: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये ९ जून रोजी भारत-पाकिस्तान मध्ये हायव्होल्टेड सामना खेळवला जाणार आहे. तत्त्पूर्वी या दोन्ही संघांच्या T20 विश्वचषकातील ७ सामन्यांचा घेतलेला आढावा.
Web Title: India vs pakistan head to head in t20 world cup history ag ieghd import