-
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डाव खेळून 10,000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 205 डावात हा पराक्रम केला. (फोटो-एपी)
-
एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीनंतर सर्वात कमी डाव खेळून 10,000 धावा करणारा फलंदाज रोहित शर्मा आहे. रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 241 डाव खेळून हा पराक्रम केला. (फोटो-एपी)
-
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर तिसऱ्या स्थानावर आहे. सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 259 डावांमध्ये हा पराक्रम केला. इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने 10,000 धावा पूर्ण केल्या होत्या. (फोटो-एपी)
-
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली या चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 10,000 धावा 263 डावात पूर्ण केल्या आहेत. (फोटो-एपी)
-
रिकी पाँटिंगने 266 डावात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या. या यादीत भारताच्या चार फलंदाजांनंतर तो पाचव्या क्रमांकावर आहे. (फोटो-एपी)
-
या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस सहाव्या स्थानावर आहे. कॅलिसने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 272 डावात 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. (फोटो-एपी)
-
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने 273 डावात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या. धोनीने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध धावांचा हा आकडा गाठला होता. (फोटो-एपी)
PHOTOS : वनडेत सर्वात जलद १०,०००धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट ‘नंबर वन’, रोहित ‘या’ क्रमांकावर विराजमान
वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात कमी डावात १०,००० धावा करणारा फलंदाज विराट कोहली आहे, पण रोहित शर्मा या क्रमांकावर आहे.
Web Title: Fastest 10000 runs in odi virat kohli is number one rohit on second position vbm