• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. indian cricketer aakash chopra commentators match fees annual contarct freshers salary spl

क्रिकेट समालोचकांना किती पगार मिळतो? आकाश चोप्राने केला खुलासा, माजी खेळाडूंची कमाई पाहून बसेल धक्का

माजी भारतीय फलंदाज आकाश चोप्रा हे भारतातील अव्वल समालोचकांपैकी एक आहेत. त्यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये समालोचक किती कमाई करतात यावर भाष्य केले आहे.

Updated: September 16, 2024 15:57 IST
Follow Us
  • indian top cricket commentators, commentary fees, aakash chopra fees
    1/9

    भारताचे माजी फलंदाज आकाश चोप्रा यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत भलेही फारसे यश मिळवले नसेल, परंतु त्यांनी समालोचनाद्वारे मोठे नाव कमावले आहे. (Photo- Aakash Chopra Instagram)

  • 2/9

    आकाश चोप्रा यांनी केवळ समालोचनातून ओळखच मिळवली नाही तर भरपूर पैसेही कमावले. आकाश चोप्रा यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये याबद्दलचा खुलासा केला आहे. (Photo- Aakash Chopra Instagram)

  • 3/9

    राज शर्मानी यांच्या पॉडकास्टमध्ये आकाश चोप्रा त्यांच्या कॉमेंट्री करिअरच्या प्रवासाबद्दल व्यक्त झाले आहेत. त्यांनी क्रिकेट खेळत असताना समालोचनाच्या दुनियेत कसा आलो? आणि हळूहळू त्यात कसा गुंतत गेलो यावर सविस्तर भाष्य केले आहे. (Photo- Aakash Chopra Instagram)

  • 4/9

    आकाश चोप्रान यांनी यावेळी समालोचनातून मिळणाऱ्या कमाईबद्दलही सांगितले आहे. चोप्रा म्हणाले की, “लोक कॉमेंट्रीच्या माध्यमातून दरवर्षी करोडो रुपये कमावतात. त्याचबरोबर फ्रेशर्सनाही चांगला पगार मिळतो.” (Photo- Aakash Chopra Instagram)

  • 5/9

    राज शर्मानी यांनी आकाश चोप्रा यांना विचारले की एक समालोचक एका वर्षात किती पैसे कमवू शकतो? यावर आकाश यांनी सांगितले की, एका समालोचकाला प्रति सामना मानधन दिले जाते. (Photo- Jatin Sapru Instagram)

  • 6/9

    आकाश यांनी सांगितले की, “कोणी कॉमेंट्रीमध्ये काम करायला सुरुवात करत असेल म्हणजेच तो फ्रेश असेल तर त्याला एका सामन्यासाठी ३५ ते ४० हजार रुपये मानधन दिले जाते. सहसा समालोचक वर्षातून १०० दिवस काम करतो. याचा अर्थ एक फ्रेशर एका वर्षात सुमारे ३५ लाख रुपये कमवू शकतो.” (Photo- Jatin Sapru Instagram)

  • 7/9

    “जेव्हा माजी खेळाडू आणि मोठे दिग्गज कॉमेंट्री करतात तेव्हा त्यांना प्रत्येक सामन्यासाठी सहा ते दहा लाख रुपये प्रति सामना मानधन मिळते.” (Photo- Jatin Sapru Instagram)

  • 8/9

    म्हणजेच ते समालोचनाच्या माध्यमातून सहा ते दहा कोटी रुपये वार्षिक उत्पन्न कमावतात. – आकाश चोप्रा (Photo- Aakash Chopra Instagram)

  • 9/9

    हेही वाचा- IND vs BAN: बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यांंमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी कोणी घे

TOPICS
आकाश चोप्राAakash Chopraक्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsक्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Indian cricketer aakash chopra commentators match fees annual contarct freshers salary spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.