• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ind v ban rishabh pant has most century as wicket keeper in wtc broke mohammad rizwan and litton das record vbm

ऋषभने मोहम्मद रिझवान आणि लिटन दासला मागे टाकत केला मोठा पराक्रम, WTC मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच यष्टीरक्षक

बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शतक झळकावून ऋषभ पंत WTC मध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला.

Updated: September 22, 2024 16:28 IST
Follow Us
  • Rishabh Pant, Mohammad Rizwan, Litton Das
    1/5

    भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि त्यानंतर चेन्नई कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. त्याच्या शतकानंतर त्याने मोहम्मद रिझवान आणि लिटन दासचे विक्रम मोडीत काढले. (एपी फोटो)

  • 2/5

    ऋषभ पंतचे हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील चौथे शतक होते आणि तो आता डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक शतके करणारा यष्टीरक्षक बनला आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानी यष्टिरक्षक रिझवान आणि लिटन दास यांच्या नावावर होता. (एपी फोटो)

  • 3/5

    मोहम्मद रिझवानने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये यष्टीरक्षक म्हणून आतापर्यंत ३ शतके झळकावली होती.आता त्याचा विक्रम ऋषभ पंतने मोडला आहे. पंतने डब्ल्यूटीसीमध्ये यष्टीरक्षक म्हणून ४ शतकं झळकावली आहेत. (एपी फोटो)

  • 4/5

    बांगलादेशचा यष्टिरक्षक लिटन दासनेही आतापर्यंत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये ३ शतके झळकावली आहेत. तो रिझवानसह पहिल्या क्रमांकावर होता. पण पंतने या दोघांनाही मागे टाकले. आता रिझवान आणि लिटन दास संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. (एपी फोटो)

  • 5/5

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक तिसऱ्या क्रमांकावर आहे. डी कॉकने डब्ल्यूटीसीमध्ये २ शतके झळकावली होती. (एपी फोटो)

TOPICS
ऋषभ पंतRishabh Pantकसोटी क्रिकेटTest cricketक्रिकेट न्यूजCricket Newsभारत विरुद्ध बांगलादेशIndia vs Bangladeshमोहम्मद रिझवानMohammad Rizwan

Web Title: Ind v ban rishabh pant has most century as wicket keeper in wtc broke mohammad rizwan and litton das record vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.