• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ind vs aus india team meets australian prime minister anthony albanese ahead of 2 day warmup match vs pm xi photos viral vbm

IND vs AUS : टीम इंडियाने सराव सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी साधला संवाद, पाहा फोटो

Team India with Australia PM : भारतीय संघ अॅडलेड कसोटीपूर्वी प्राईम मिनिस्टर इलेव्हनविरूद्ध दोन दिवसीय गुलाबी चेंडूचा सराव सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट घेतली.

Updated: November 30, 2024 14:35 IST
Follow Us
  • Team India meet Australia PM Anthony Albanese photo viral
    1/9

    भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिला सामना पर्थ येथे खेळला गेला. ज्यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

  • 2/9

    या मालिकेतील दुसरा सामना अॅडलेड येथे खेळला जाणार आहे. तत्पूर्वी भारत आणि प्राईम मिनिस्टर इलेव्हन यांच्यातील दोन दिवसीय सराव सामन्याच्याआधी दोन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यानी भारतीय संघाची भेट घेतली.

  • 3/9

    यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी दोन्ही संघांबरोबर फोटो काढला आणि टीम इंडियाबरोबर सेल्फीही काढला. तर भारताचा कर्णधार रोहित शर्माने कॅनबेरा येथील संसदेत भाषणही केले.

  • 4/9

    ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी या भेटीदरम्यान संघाच्या प्रत्येक खेळाडूची भेट घेत त्यांच्याशी गप्पा मारल्या. यादरम्यान रोहित शर्माने आधी उपकर्णधार जसप्रीत बुमराहची ओळख करून दिली.

  • 5/9

    बुमराहच्या कामगिरीचे खुद्द पंतप्रधानांनीही कौतुक करत त्याला स्टार म्हणाले. यानंतर बुमराहच्या बाजूला विराट उभा होता. त्यानंतर रोहितने विराटचं नाव सांगितलं पण त्याआधीच पंतप्रधानांनी हॅलो म्हणत विराटशी बोलणं सुरू केलं.

  • 6/9

    ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी या भेटीदरम्यान कोहलीला म्हटलं की, “पर्थमधील तुझी कामगिरी खूप शानदार होती. तू अशावेळी एक चांगली खेळी केलीस जेव्हा आम्ही आधीच बॅकफूटवर होतो

  • 7/9

    यावर विराट कोहली म्हणाला, थोडं अजून मसालेदार केलं.” यावर पंतप्रधान म्हणाले, “हो तुम्ही भारतीय आहात. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी या भेटीचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 8/9

    या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं की, या आठवड्यात मनुका ओव्हल मैदानावर शानदार भारतीय संघाचं प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघासमोर मोठे आव्हान आहे.

  • 9/9

    पण मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितल्याप्रमाणे ऑसी संघाला हा सामना जिंकण्यासाठी पाठिंबा देणार आहे. (Photo Source – BCCI/ albomp insta)

TOPICS
ऑस्ट्रेलियाAustraliaकसोटी क्रिकेटTest cricketटीम इंडियाTeam Indiaबॉर्डर-गावस्कर ट्रॉफीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाInd vs Aus

Web Title: Ind vs aus india team meets australian prime minister anthony albanese ahead of 2 day warmup match vs pm xi photos viral vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.