• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rahul dravid on wheel chair photos viral despite his injuries present for rajasthan royals team fans praised for dedication ipl 2025 bdg

IPL 2025: दुखापत, कुबड्या अन् व्हिलचेअर; राहुल द्रविड तरीही राजस्थान संघासाठी मैदानावर उपस्थित; ‘द वॉल’चं होतंय कौतुक

Rahul Dravid Wheelchair Photo Viral: राजस्थान रॉयल्सचे हेड कोच असलेले राहुल द्रविड यांना दुखापत झाली असून त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. पण तरीही ते संघाबरोबर उपस्थित असल्याचे फोटो पाहायला मिळत आहेत.

March 27, 2025 13:27 IST
Follow Us
  • Rahul Dravid on Wheel Chair RR IPL 2025
    1/11

    आयपीएल २०२५ साठी राजस्थान रॉयल्सचे हेड कोच म्हणून राहुल द्रविड यांची वर्णी लागली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे हेड कोट म्हणून राजीनामा दिल्यानंतर ते पुन्हा आयपीएलमध्ये कोच म्हणून दिसणार आहेत. पण यंदा हंगामाच्या सुरूवातीलाच द्रविड यांचे व्हिलचेअरवरील फोटो व्हायरल होत आहेत.

  • 2/11

    राजस्थान रॉयल्सचे हेड कोच राहुल द्रविड यांना हंगामाच्या काही दिवसाआधी क्लब क्रिकेट खेळत असताना पायाला दुखापत झाली आणि त्यानंतर त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. पण तरीही द्रविड संघाबरोबर या सीझनसाठी उपस्थित आहेत.

  • 3/11

    राहुल द्रविड व्हिलचेअर आणि कुबड्यांच्या आधारे संघाचे सराव सत्र, सामने, टीम मिंटिंग्स याला उपस्थित असतात.

  • 4/11

    राहुल द्रविड यांना दुखापत असूनही संघाबरोबर उपस्थित असताना आणि पिचची पाहणी करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत आणि राहुल द्रविड यांचे कौतुकही केले जात आहे.

  • 5/11

    IPL 2025 मधील सहावा सामना केकेआर वि. आरआर यांच्यात खेळवला गेला, ज्यामध्ये राजस्थान संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं.

  • 6/11

    केकेआर-राजस्थान सामन्यापूर्वी राहुल द्रविड व्हिलचेअरवरून केकेआरच्या खेळाडूंची भेट घेताना दिसले.

  • 7/11

    सध्याचा केकेआरचा कर्णधार जो यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहिला होता, त्यावेळेस राहुल द्रविड संघाचे कोच होते…. द्रविड दिसताच अजिंक्य रहाणे मोठ्या स्मितहास्यासह त्यांना भेटण्यासाठी पोहोचल्याचा व्हीडिओही पाहायला मिळत आहे.

  • 8/11

    राहुल द्रविड सातत्याने राजस्थानच्या संघातील खेळाडूंशी चर्चा करताना दिसतात.

  • 9/11

    राजस्थान रॉयल्स संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. रियान परागच्या नेतृत्त्वाखालील संघ दुसऱ्या सामन्यातही पराभूत झाला,

  • 10/11

    केकेआरने फिरकीसाठी अनुकूल असलेल्या गुवाहाटीच्या खेळपट्टीवर राजस्थानचा ८ विकेट्सने पराभव केला.

  • 11/11

    क्विंटन डि-कॉकच्या ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर केकेआरने हा विजय सहज नोंदवला. त्याच्या या खेळीचं कौतुक करण्यासाठी राहुल द्रविड कुबड्यांच्या आधारे मैदानावर पोहोचले आणि त्याला हात मिळवत शाबासकी दिली. (वरील सर्व फोटो-@RajasthanRoyals @KKR)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025केकेआरKKRमराठी बातम्याMarathi Newsराजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)Rajasthan Royalsराहुल द्रविडRahul Dravid

Web Title: Rahul dravid on wheel chair photos viral despite his injuries present for rajasthan royals team fans praised for dedication ipl 2025 bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.