• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. sachin tendulkar invested in these 10 business startup companies jshd import asc

सचिन व्यवसायातही ‘मास्टर’, ‘या’ १० स्टार्टअप्समध्ये केलीय गुंतवणूक

सचिनची या स्टार्टअप्समधील गुंतवणूक केवळ आर्थिक आधार देत नाही तर त्याच्या ब्रँड असोसिएशनमुळे कंपन्यांची विश्वासार्हता देखील वाढते.

April 27, 2025 17:39 IST
Follow Us
  • Sachin Tendulkar business ventures
    1/12

    भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने नुकताच त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा केला. क्रिकेटमधील गौरवशाली कारकिर्दीनंतर, तो आता व्यवसाय आणि स्टार्टअप जगात देखील सक्रिय भूमिका बजावत आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याचा प्रभाव कमी झालेला नाही, उलट आता तो तरुण उद्योजकांना पाठिंबा देत आहे आणि त्याने अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. (छायाचित्र स्रोत: सचिन तेंडुलकर/फेसबुक)

  • 2/12

    सचिनची या स्टार्टअप्समधील गुंतवणूक केवळ कंपन्यांना आर्थिक आधार देत नाही तर त्याच्या ब्रँड असोसिएशनमुळे या कंपन्यांची विश्वासार्हता देखील वाढते. सचिन तेंडुलकरने कोणत्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (छायाचित्र स्रोत: सचिन तेंडुलकर/फेसबुक)

  • 3/12

    स्मॅश एंटरटेनमेंट (Smaaash Entertainment)
    २००९ मध्ये सुरू झालेल्या या मनोरंजन कंपनीत सचिन तेंडुलकरने गुंतवणूक केली होती, २०१३ मध्ये त्याने कंपनीतील १८% हिस्सेदारी खरेदी केली होती. ही कंपनी व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी आणि स्पोर्ट्स गेमिंग अनुभव प्रदान करते. करोना काळात या कंपनीला तोटा सहन करावा लागला असला तरी, ही कंपनी आता रायपूर आणि विजयवाडा येथे पुन्हा सक्रिय झाली आहे. (छायाचित्र स्रोत: सचिन तेंडुलकर/फेसबुक)

  • 4/12

    जेटसिंथेसिस (JetSynthesys)
    २०१४ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीत सचिनने २०२१ मध्ये मोठी गुंतवणूक केली. जेटसिंथेसिस गेमिंग, फिनटेक आणि डिजिटल कंटेंटमध्ये काम करते. सचिनचा या कंपनीसोबत ‘१०० एमबी’ नावाचा एक प्रकल्प देखील आहे, जो क्रिकेट चाहत्यांसाठी एक डिजिटल समुदाय तयार करण्याचा प्रयत्न आहे. (छायाचित्र स्रोत: सचिन तेंडुलकर/फेसबुक)

  • 5/12

    आंतरराष्ट्रीय टेनिस प्रीमियर लीग (International Tennis Premier League)
    सचिन तेंडुलकरने २०१४ मध्ये या लीगच्या मुंबई संघात गुंतवणूक केली होती. त्याला टेनिसची खूप आवड आहे. आर्थिक समस्यांमुळे २०१६ मध्ये ही लीग बंद पडली. (छायाचित्र स्रोत: सचिन तेंडुलकर/फेसबुक)

  • 6/12

    स्पिनी (Spinny)
    २०१५ मध्ये सुरू झालेल्या या युज्ड (वापरलेल्या किंवा सेकेंड हँड) कार विक्री करण्यासाठीच्या प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली सचिनने गुंतवणूक केली आहे. २०२१ मध्ये तो या कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर देखील बनला. २०२२ मध्ये, पीव्ही सिंधूबरोबर त्याने ‘लाँग ड्राईव्ह ऑफ हॅप्पिनेस’ ही मोहीम सुरू केली होती. (छायाचित्र स्रोत: सचिन तेंडुलकर/फेसबुक)

  • 7/12

    स्मार्ट्रॉन (Smartron)
    ही हैदराबादस्थित आयओटी कंपनी आहे ज्यामध्ये सचिनने २०१६ मध्ये गुंतवणूक केली आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडर देखील बनला. त्याने त्याच्या स्मार्टफोनची जाहिरातही केली. कंपनी तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देत आहे. (छायाचित्र स्रोत: सचिन तेंडुलकर/फेसबुक)

  • 8/12

    इंडियन सुपर लीग (ISL)
    २०१४ मध्ये सचिनने कोची येथील संघ केरळ ब्लास्टर्समध्ये गुंतवणूक केली. २०१८ मध्ये आर्थिक कारणांमुळे त्याने या संघातील त्याचा हिस्सा विकला. (छायाचित्र स्रोत: सचिन तेंडुलकर/फेसबुक)

  • 9/12

    मुसाफिर (Musafir)
    ही एक प्रीमियम ट्रॅव्हल कंपनी आहे ज्यामध्ये सचिनने ७.५% हिस्सा खरेदी केला होता. त्याने २०१७ पर्यंत भारत आणि युएईमध्ये कार्यरत असलेल्या या कंपनीत गुंतवणूक केली होती. (छायाचित्र स्रोत: सचिन तेंडुलकर/फेसबुक)

  • 10/12

    ट्रू ब्लू (True Blue)
    २०१६ मध्ये, सचिनने अरविंद फॅशन्सच्या सहकार्याने हा पुरूषांच्या कपड्यांचा ब्रँड लाँच केला. हा ब्रँड भारतीय कपड्यांना जागतिक बाजारात विक्रीचं व्यासपीठ देत आहे. (छायाचित्र स्रोत: सचिन तेंडुलकर/फेसबुक)

  • 11/12

    एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रा. लि. (SRT Sports Management Pvt. Ltd.)
    ही कंपनी सचिन आणि त्याची पत्नी अंजली दोघे मिळून चालवतात. ही कंपनी क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात तरुणांना मदत करते. (छायाचित्र स्रोत: सचिन तेंडुलकर/फेसबुक)

  • 12/12

    एस ड्राइव्ह अँड सॅच (S Drive and Sach)
    २००७ मध्ये, सचिनने आरोग्य आणि तंदुरुस्तीशी संबंधित उत्पादने बनवणाऱ्या या कंपनीत गुंतवणूक केली होती. त्यांची उत्पादने बिग बाजार आणि मणिपाल क्युअर अँड केअर सारख्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. (छायाचित्र स्रोत: सचिन तेंडुलकर/फेसबुक)

TOPICS
अर्थवृत्तान्तArth Vrutantक्रिकेटCricketबिझनेस न्यूजBusiness Newsसचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: Sachin tendulkar invested in these 10 business startup companies jshd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.