-
IPL 2025, Jitesh Sharma : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने लखनौ सुपरजायंट्सवर दणदणीत विजय मिळवत आयपीएलच्या क्वालिफायर १ मध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. (Photo: BCCI)
-
आरसीबीने कर्णधार जितेश शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर लखनौचा ६ विकेट्सने पराभव केला आहे. (Photo: BCCI)
-
जितेश शर्माने अवघ्या ३३ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८५ धावा चोपल्या. याशिवाय आरसीबीने इतिहासात पहिल्यांदाच सर्वात मोठं (२२८) लक्ष्य यशस्वीपणे पार करत विजय मिळवला आणि १४ सामन्यांनंतर गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवलं आहे. कर्णधार जितेश शर्मा हा बँगलोरच्या विजयाचा शिल्पकार ठरला. (Photo: BCCI)
-
दरम्यान, आज आपण जितेशची पत्नी आणि त्यांची लव्हस्टोरी याबद्दल जाणून घेऊयात… (Photo: Shalaka Makeshwar/Instagram)
-
जितेशच्या पत्नीचे नाव शलाका मकेश्वर आहे. (Photo: Shalaka Makeshwar/Instagram)
-
३० वर्षीय जितेश शर्माने शलाकाबरोबर अचानक लग्न करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. (Photo: Shalaka Makeshwar/Instagram)
-
जितेश शर्मा आणि शलाका मकेश्वर हे बराच काळ एकमेकांना डेट करत होते त्यानंतर त्यांनी ८ ऑगस्ट २०२४ रोजी लग्न केले. (Photo: Shalaka Makeshwar/Instagram)
-
जितेश शर्माची पत्नी शलाका मकेश्वर ही पुण्यातील रहिवासी आहे. (Photo: Shalaka Makeshwar/Instagram)
-
लिंक्डइनच्या मते, ती सध्या नागपूरमधील ग्लोबल लॉजिक आयटी कंपनीत वरीष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. (Photo: Shalaka Makeshwar/Instagram)
-
शलाका मकेश्वर ही उच्च शिक्षित आहे. तिने प्रा. राम मेघे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये बीई केले आहे. (Photo: Shalaka Makeshwar/Instagram)
-
तसेच शलाकाने यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातून व्हीएलएसआय डिझाइनमध्ये एम.टेकही केले आहे. (Photo: Shalaka Makeshwar/Instagram) हेही पाहा- अंजली आणि सचिन तेंडुलकर यांच्या लग्नाला ३० वर्षे पूर्ण, पाहा लेक साराने शेअर केलेले Unseen Photos
जितेश शर्माच्या प्रेमाची गोष्ट; मराठी मुलीबरोबर लग्न, काय करते पत्नी? जाणून घ्या…
Jitesh Sharma wife Shalaka Makeshwar : जितेश शर्मा आणि शलाका मकेश्वर हे बराच काळ एकमेकांना डेट करत होते त्यानंतर त्यांनी ८ ऑगस्ट २०२४ रोजी लग्न केले.
Web Title: Jitesh sharma rcb best captain knock of ipl 2025 know about his love story with wife shalaka makeshwar spl