• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2025 vaibhav suryavanshi to ayush mhatre priyansh arya prabhsimran singh these upcapped playes will be future of indian cricket team spl

वैभव सूर्यवंशी ते आयुष म्हात्रे; भारतासाठी न खेळलेल्या ‘या’ खेळाडूंनी यंदा आयपीएल गाजवलं

यादीत वैभव सूर्यवंशी ते प्रियांश आर्य-आयुष म्हात्रे यांच्या नावांचा समावेश आहे.

Updated: May 28, 2025 15:26 IST
Follow Us
  • uncapped players in ipl 2025
    1/10

    आयपीएल २०२५ मध्ये अनेक तरुण अनकॅप्ड खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. या खेळाडूंची कामगिरी पाहिल्यानंतर, हे खेळाडू भारतीय संघाचे भविष्य आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या यादीत वैभव सूर्यवंशी ते प्रियांश आर्य-आयुष म्हात्रे यांच्या नावांचा समावेश आहे. (Photo: BCCI)

  • 2/10

    राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ मध्ये सर्वांची मनं जिंकली आहेत. हा १४ वर्षांचा खेळाडू टीम इंडियाचे भविष्य असू शकतो. त्याने ७ डावांमध्ये ३६ च्या सरासरीने आणि २०६.५६ च्या स्ट्राईक रेटने २५२ धावा केल्या. त्याने एक शतक आणि एक अर्धशतकही झळकावले आहे. (Photo: IPL/Social Media)

  • 3/10

    सीएसकेचा युवा फलंदाज आयुष म्हात्रेनेही या हंगामात खूप नाव कमावले. एकीकडे सीएसकेचे खेळाडू अपयशी ठरत असताना, म्हात्रे स्फोटक फलंदाजी करत होता. (Photo: IPL/Social Media)

  • 4/10

    त्याने ७ डावांमध्ये ३४.२९ च्या सरासरीने आणि १८८.९८ च्या स्ट्राईक रेटने २४० धावा केल्या आहेत. (Photo: IPL/Social Media)

  • 5/10

    पंजाब किंग्जचा युवा फलंदाज प्रियांश आर्य याने या हंगामात संघासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे. (Photo: IPL/Social Media)

  • 6/10

    त्याने सीएसके विरुद्ध एक तुफानी शतकही झळकावले. त्याने १४ सामन्यांमध्ये ३०.२९ च्या सरासरीने ४२४ धावा केल्या आहेत. (Photo: IPL/Social Media)

  • 7/10

    लखनौ सुपर जायंट्सचा स्टार युवा फिरकीपटू दिग्वेश राठीने या हंगामात खूप चांगली कामगिरी केली आहे. त्याने अनेक महान फलंदाजांचे विकेट काढले आहेत. (Photo: IPL/Social Media)

  • 8/10

    त्याने १३ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याने खूप किफायतशीर गोलंदाजी देखील केली आहे. (Photo: BCCI)

  • 9/10

    दिल्ली कॅपिटल्सच्या विपराज निगमने आयपीएल २०२५ मध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये आपली ताकद दाखवली आहे. निगमने अष्टपैलू खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. त्याने ८ डावांमध्ये फलंदाजीत १४२ धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीत १३ डावांमध्ये ११ विकेट्स घेतल्या आहेत. (Photo: IPL/Social Media)

  • 10/10

    (Photo: BCCI) हेही पाहा- जितेश शर्माच्या प्रेमाची गोष्ट; मराठी मुलीबरोबर लग्न, काय करते पत्नी? जाणून घ्या…

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रीडाSportsखेळGameखेळाडूPlayer

Web Title: Ipl 2025 vaibhav suryavanshi to ayush mhatre priyansh arya prabhsimran singh these upcapped playes will be future of indian cricket team spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.