-
यंदा आयपीएल विविध कारणांनी चर्चेत राहिले आहे. यावर्षी २०२२ नंतर पहिल्यांदा नवा चॅम्पियन मिळणार आहे. आज पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बॅगलोर यांच्यात अंतिम सामना खेळला जाणार आहे. (Photo: IPl/Social Media)
-
दरम्यान, यंदा लखनौ सुपर जायंट्सचा फिरकीपटू दिग्वेश राठीचे नोटबुक सेलीब्रेशन चर्चेत राहिले. (Photo: BCCI)
-
त्याचा आणि सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माचा मैदानातील वादही सर्वांचे लक्ष वेधून गेला. (Photo: IPl/Social Media)
-
यानंतर बीसीसीआयने दिग्वेशला दंड ठोठावला. यंदा आयपीएलमध्ये दिग्वेशवर एकूण तीन वेळा कारवाई करण्यात आली आहे. (Photo: IPl/Social Media)
-
पहिली कारवाई – १ एप्रिल २०२५ – लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना
कारवाईचं कारण : पंजाब किंग्सच्या प्रियांश आर्याला बाद केल्यावर नोटबूक सेलिब्रेशन व विरोधी खेळाडूशी शारिरिक संपर्क. आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टमधील कलम २.५ अंतर्गत लेव्हल १ चं उल्लंघन
दंड : सामना शुल्कापैकी २५ टक्के दंड व एक डिमेरिट प्वाइंट (Photo: IPl/Social Media) -
दुसरी कारवाई – ४ एप्रिल २०२५ – लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना
कारवाईचं कारण : मुंबई इंडियन्सच्या नमन धीरला बाद केल्यावर पुन्हा ‘नोटबूक’ सेलिब्रेशन.
दंड : सामना शुल्कापैकी ५० टक्के दंड व २ डिमेरिट प्वाइंट (Photo: IPl/Social Media) -
तिसरी कारवाई – १९ मे २०२५ – लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना
कारवाईचं कारण : सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माशी वाद. आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टमधील कलम २.५ अंतर्गत लेव्हल १ चं उल्लंघन
दंड : सामना शुल्कापैकी ५० टक्के दंड, २ डिमेरिट प्वाइंट आणि एका सामन्याची बंदी
एकूण डिमेरिट प्वाइंट्स – पाच (Photo: IPl/Social Media) -
दिग्वेशवरील एकूण कारवाई
२५ टक्के दंड म्हणजेच १.८७ लाख रुपये, दोन वेळा ५० टक्के दंड म्हणजे ७.५० लाख रुपये. एका सामन्याची बंदी म्हणजेच ७.५० लाख रुपयांचं नुकसान, याचाच अर्थ त्याचं १६.८७ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. आयपीएलच्या महालिलावात लखनौ सुपरजायंट्सने दिग्वेशला ३० लाख रुपयांमध्ये करारबद्ध केलं होतं आणि आता त्याचं १६.८७ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. (Photo: BCCI) -
(Photo: IPl/Social Media) हेही पाहा- IPL 2025: यंदाच्या हंगामात ऑस्ट्रेलियाचे किती खेळाडू कोणत्या संघाकडून खेळले? त्यांची सॅलरी किती?
IPL 2025: यंदा दिग्वेश राठीचं नोटबुक सेलीब्रेशन चर्चेत राहिलं; ठरला दंडाचा मानकरी…
IPL 2025 : यंदा लखनौ सुपर जायंटचा फिरकीपटू दिग्वेश राठीचे नोटबुक सेलिब्रेशन चर्चेत राहिले.
Web Title: Ipl 2025 lsg s player digvesh rathi notebook celebration fight with abhishek sharma and fine spl