-
Shubman Gill Century Vs England: पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. यातील पहिल्या सामन्याला कालपासून सुरुवात झाली आहे.
-
हेडिंग्ले येथे सुरू असलेल्या या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने दमदार कामगिरी केली असून, पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ३ बाद ३५९ धावा केल्या होत्या.
-
भारताच्या या डावात सलामीवीर यशस्वी जयस्वालने दमदार शतक केले आहे. तर दुसरा सलामीवीर के. एल. राहुलने ४२ धावांची खेळी केली.
-
दरम्यान, या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा साई सूदर्शन मात्र शून्यावर बाद झाला आहे. मात्र चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार शुभमन गिलने खणखणीत शतक झळकावले आहे.
-
पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा शुभमन गिल नाबाद १२७ धावांवर खेळत होता. तर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋषभ पंतने नाबाद ६५ धावा केल्या आहेत.
-
दरम्यान, भारतीय फलंदाजांनी केलेल्या या दमदार कामगिरीचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने तोंडभरून कौतुक केले आहे.
-
सचिन तेंडुलकरने एक्सवर एक पोस्ट केली असून, शतकी खेळी करणाऱ्या शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
आपल्या पोस्टमध्ये सचिन म्हणाला की, “भारताच्या आजच्या फलंदाजीने मला २००२ मधील हेडिंग्ले कसोटीची आठवण करून दिली, ज्यामध्ये राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि मी शतके झळकावली होती. आम्ही तो कसोटी सामना जिंकला होता.”
-
आपल्या पोस्टमध्ये सचिन पुढे म्हणाला की, “आज, यशस्वी आणि शुभमनने त्यांचे कर्तव्य बजावले आहे. आता यावेळी तिसरा शतकवीर कोण असेल?” (सर्व फोटो सौजन्य: @BCCI/X)
Shubman Gill: “आज मला द्रविड आणि गांगुलीची आठवण झाली”, गिल-जयस्वालच्या शतकी खेळीनंतर मास्टर ब्लास्टर असे का म्हणाला?
Shubman Gill Century: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असून, यामध्ये भारत इंग्लंड विरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
Web Title: Yashasvi jaiswal shubman gill sachin tendulkar headingley test india vs england rahul dravid sourav ganguly aam