-
भारताविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत जो रूटने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जो रूट सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
(फोटो- एक्स) -
यासह जो रूटने एकाच दिवशी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल द्रविड , जॅक कॅलिस आणि रिकी पाँटिंग यांना मागे सोडलं आहे. दरम्यान कोण आहेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज? जाणून घ्या.
(फोटो- एक्स) -
या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिनने १५९२१ धावा केल्या आहेत.
( फोटो- एक्स) -
आता रूट दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. रूटने १३३७९ धावा केल्या आहेत.
(फोटो-एक्स) -
तिसऱ्या स्थानी असलेल्या रिकी पाँटिंगने १३३७८ धावा केल्या होत्या.
(फोटो- एक्स) -
या यादीत चौथ्या स्थानी असलेल्या जॅक कॅलिसच्या नावे १३२८९ धावा करण्याची नोंद आहे.
(फोटो-एक्स) -
तर राहुल द्रविडच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये १३२८८ धावा करण्याची नोंद आहे. (फोटो- एक्स)
Ind vs Eng: जो रूटने एकाच दिवशी ३ दिग्गजांना मागे टाकलं! पाहा कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
Joe Root Record: इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने मोठा विक्रम मोडून काढला आहे. दरम्यान कोण आहेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज? जाणून घ्या.
Web Title: Joe root becomes 2nd highest run scorer in test cricket by surpassing jacques kallis ricky ponting rahul dravid amd