-
भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वीच सानिया चंडोकसोबत साखरपुडा उरकला आहे. मात्र तेंडुलकर कुटुंबियांकडून या सोहळ्यातील एकही फोटो शेअर करण्यात आला नव्हता. दरम्यान आता सचिनने आपली मुलगी सारा तेंडुलकर आणि होणारी सून सानिया चंडोकसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
(फोटो- इंडियन एक्सप्रेस) -
सचिनची लेक सारा तेंडुलकरने मुंबईत पिलेट्स अकॅडमी सुरू केली आहे. या अकॅडमीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सचिनसह अंजली तेंडुलकर, सारा तेंडुलकर आणि सानिया चंडोकने देखील हजेरी लावली होती. (फोटो- सचिन तेंडुलकर/ इंस्टाग्राम)
-
सचिनने हे फोटो शेअर केल्यानंतर, सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. कारण अर्जुनसोबत साखरपुडा झाल्यानंतर तेंडुलकर कुटुंबातील एकानेही सानिया किंवा अर्जुनसोबतचा फोटो शेअर केला नव्हता. (सचिन तेंडुलकर/ इंस्टाग्राम)
-
सचिनने पहिल्यांदाच इंस्टाग्रामवर कौटुंबिक कार्यक्रमातील फोटो शेअर केला होता. या फोटोत तेंडुलकर कुटुंबाची होणारी सून सानिया चंडोक मुख्य आकर्षण ठरत आहे. ( फोटो- सचिन तेंडुलकर/इंस्टाग्राम)
-
सारा तेंडुलकरने मुंबईत पिलेट्स अकॅडमी सुरू केली आहे. ही दुबईच्या फ्रँचायझीची मुंबईतील चौथी शाखा आहे. (सचिन तेंडुलकर/ इंस्टाग्राम)
-
तसेच अर्जुन आणि सानियाबद्दल बोलायचं झालं, तर १३ ऑगस्टला दोघांचा साखरपुडा झाला. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. (फोटो- फायनान्शियल एक्सप्रेस)
Sachin Tendulkar: सचिनने पहिल्यांदाच शेअर केला सुनेसोबतचा फोटो; अंजली-साराही दिसल्या सोबत
Sachin Tendulkar Instagram Post: भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पहिल्यांदाच आपल्या सुनेसोबतचा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
Web Title: Sachin tendulkar shared family photo sania chandhok sara tendulkar anjali tendulkar amd