-
पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज आजम खान आपल्या भरभक्कम शरीरामुळे नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान त्याला फिटनेसबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भरभक्कम शरीरयष्टी असूनही त्याला पाकिस्तानसाठी काही सामने खेळण्याची संधी मिळाली. यासह जगभरातील काही लीग सामन्यांमध्येही त्याला खेळण्याची संधी मिळाली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
त्याच्या फिटनेसवर पाकिस्तानच्या अनेक खेळाडू्ंनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अशी फिटनेस असताना संघात स्थान का? असंही अनेकदा म्हटलं गेलं आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
दरम्यान आता आजम खानने आपल्या फिटनेसबाबत मोठं वक्तव्य केलं आहे, वजन कमी न करण्याचं त्याने असं काही कारण दिलं आहे. जे खरं वाटणं तर दूर, पण कोणालाच पटणार नाही. (फोटो- जनसत्ता)
-
“एक- दोन आठवड्यात वजन कमी होत नाही. त्यासाठी पुरेसा वेळ लागतो. पण गेल्या ४-५ वर्षांपासून मी सतत क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे वजन कमी झालेलं नाही”, असं आजम खानने एका मुलाखतीत सांगितलं. (फोटो- जनसत्ता)
-
क्रिकेटमधील व्यस्त वेळापत्रकामुळे त्याला फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळालेली नाही, असंही त्याने सांगितलं. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
Azam Khan: “क्रिकेटमुळे वजन कमी करण्यासाठी वेळच मिळाला नाही,” आजम खानचा भन्नाट दावा
Azam Khan Fitness: पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज आजम खानने वजन कमी न होण्याचं भन्नाट कारण सांगितलं आहे.
Web Title: Pakistan cricketer azam khan gave bizarre reason to not loosing weight amd