-
Hockey Asia Cup 2025 : बिहारमधील राजगीर हॉकी स्टेडियमवर शुक्रवारी (२९ ऑगस्ट) संध्याकाळी खेळवण्यात आलेल्या हॉकी आशिया चषक २०२५ च्या पहिल्या सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाने चीनचा ४-३ असा पराभव केला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने या चुरशीच्या स्पर्धेत एक सनसनाटी हॅटट्रिक केली. हॉकी आशिया चषक २०२५ ही स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ दरम्यान बिहारमधील राजगीर येथे खेळवली जात आहे. ही या स्पर्धेची १२ वी आवृत्ती आहे आणि २०२६ च्या एफआयएच (फेडरेशन इंटरनॅशनल डी हॉकी) हॉकी विश्वचषकासाठी पात्रता फेरी म्हणून देखील महत्त्वाची आहे. (Photo Source: PTI)
-
सामन्याच्या १२ व्या मिनिटाला चीनने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून सुरुवातीलाच आघाडी घेतली होती. फाऊल जिंकणाऱ्या डु शिहाओने संधीचं सोनं करत चीनचं खातं उघडलं. (Photo Source: PTI)
-
पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी अनेक गोलचे प्रयत्न केले. मात्र, चीन यात एका गोलची आघाडी मिळवण्यात यशस्वी ठरला. पिछाडीवर असलेल्या भारताने मध्यंतरापूर्वी लागोपाठ दोन गोल करत पुनरागमन केले आणि २-१ अशी आघाडी घेतली. (Photo Source: PTI) -
कर्णधार हरमनप्रीतने त्याच्या ट्रेडमार्क ड्रॅग फ्लिकसह आणखी एक गोल केला. चेंडू चीनच्या गोलकीपरच्या हाताला लागून नेटमध्ये गेला. (Photo Source: PTI)
-
तर, बेनहाईने पेनल्टी कॉर्नरवर आणखी एक गोल करून चीनचं पुनरागमन केलं आणि शेवटच्या क्वार्टरपूर्वी दोन्ही संघांची बरोबरी साधली. (Photo Source: PTI)
-
शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताचा मनप्रीत सिंग गोल वाचवण्यासाठी चीनच्या झांग झियाओजिया आणि इतरांबरोबर एकटाच भिडला. त्याच्या एका डाइव्हमुळे मैदानावर गोंधळ उडाला होता. (Photo Source: PTI)
-
खेळाच्या शेवटच्या क्षणी भारतीय कर्णधाराने पुन्हा एकदा राष्ट्रीय संघासाठी गोल केला आणि तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला निर्णायक आघाडी मिळवून दिली. (Photo Source: PTI)
-
सामना चुरशीचा होता, पण भारताच्या दमदार कामगिरीमुळे त्यांना पूल स्टेजमध्ये महत्त्वाचे तीन गुण मिळाले. (Photo Source: PTI)
-
शुक्रवारी बिहारमधील राजगीर येथे भारत आणि चीन यांच्यातील पुरुष हॉकी आशिया कप २०२५ सामन्यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंग, जर्मनप्रीत सिंग आणि इतरांना शुभेच्छा दिल्या.(Photo Source: PTI)
Hockey Asia Cup 2025 : भारताची चीनवर मात! कर्णधार हरमनप्रीतची हॅटट्रिक ते मनप्रीतची डाइव्ह, पाहा सामन्यातील जबरदस्त क्षण
सामन्याच्या १२ व्या मिनिटाला चीनने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून सुरुवातीलाच आघाडी घेतली होती. पण भारताने ही आघाडी मोडून काढत विजय साकारला.
Web Title: Hockey asia cup 2025 best moments of india defeats china by 4 3 photos fehd import asc