-
नजीबुल्लाह झाद्रान
टी-२० आशिया कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नजीबुल्लाह झाद्रानच्या नावे आहे. अफगाणिस्तानचा फलंदाज झाद्रानने स्पर्धेच्या टी-२० स्वरूपात ८ सामने खेळले आहेत आणि १३ षटकार मारले. (Photo: X) -
रहमानउल्लाह गुरबाज
अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक व फलंदाज रहमानउल्लाह गुरबाजने टी-२० आशिया कपमध्ये पाच सामन्यांमध्ये १२ षटकार मारले आहेत. तो २०२५ च्या टी-२० आशिया कपसाठी अफगाणिस्तान संघाचा भाग आहे. (Photo: X) -
रोहित शर्मा
‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माने टी-२० आशिया कपमध्ये ९ सामन्यांमध्ये १२ षटकार मारलेत. त्याने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. (Photo: X) -
रोहित आता भारतासाठी फक्त एकदिवसीय सामने खेळू शकेल. तो भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. (Photo: X)
-
विराट कोहली
या यादीत स्टार फलंदाज विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने टी-२० आशिया कपमध्ये १० सामने खेळत ११ षटकार मारले. (Photo: X) -
कोहलीने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. (Photo: X)
-
बाबर हयात
या यादीत हाँगकाँगचा फलंदाज बाबर हयात पाचव्या क्रमांकावर आहे. हयातने टी-२० आशिया कपमध्ये पाच सामन्यांमध्ये १० षटकार मारलेत. आशिया कप २०१६ मध्ये पहिल्यांदाच टी-२० स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. (Photo: X) हेही पाहा- Ganeshotsav 2025: अमृता धोंगडेचा गणेशोत्सवात सुंदर लूक, घरातल्या बाप्पाबरोबर काढले फोटो
Asia Cup 2025: रोहित- विराट नाही तर ‘या’ खेळाडूने टी-२० आशिया कपमध्ये ठोकलेत सर्वाधिक षटकार
आशिया कप २०२५ ला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. यंदा ही स्पर्धा अमेरिकेत होणार आहे. आगामी आशिया कप टी२० स्वरूपात खेळला जाणार आहे. टी२० आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोण आहे अव्वल स्थानी?
Web Title: Aisa cup 2025 top five batsmen with most sixes in t20 who is number 1 virat kohli rohit sharma spl