-
हार्दिक पंड्याची नवीन हेअर स्टाईल: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या २०२५ च्या आशिया कपमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज आहे, परंतु यावेळी हार्दिक एका नवीन लूकमध्ये मैदानावर दिसणार आहे.
-
या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी हार्दिक पंड्याने स्टायलिश लूक धारण केला आहे आणि तो खूपच आकर्षक दिसत आहे. त्याच्या नवीन लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
आशिया कपसाठी टीम इंडिया यूएईला पोहोचली आहे आणि त्याआधी हार्दिक पंड्या एका नवीन लूकमध्ये दिसला. त्याने आपले केस अशा स्टाईलमध्ये कापले आहेत ज्यामध्ये त्याचे केस बाजूंनी लहान आहेत आणि एक लांब पोनीटेल मागे सोडली आहे.
-
त्याने त्याचे केस हलक्या सोनेरी रंगात रंगवले आहेत पांड्याचा केसांचा रंग काळा होता, पण आता तो पूर्णपणे पांढरा दिसतो आहे.
-
हार्दिक पांड्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या नवीन लूकचा फोटो पोस्ट केला आणि त्याला “न्यू मी” असे कॅप्शन दिले. त्याने त्याच्या नवीन हेअरस्टाईलचे ५ फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो कधी मागे तर कधी समोर त्याचे केस दाखवत आहे.
-
हार्दिक पांड्या हा टीम इंडियामधील सर्वात फॅशनेबल खेळाडूंपैकी एक आहे आणि त्याच्या नवीन लूकवर प्रतिक्रिया देताना त्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्याने एक फायर इमोजी पोस्ट केला आहे.
-
हार्दिक पंड्याने भारतासाठी ११४ टी-२० सामने खेळले आहेत ज्यात त्याने १८१२ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने ५ अर्धशतके केली आहेत आणि आतापर्यंतचा त्याचा सर्वोत्तम स्कोअर नाबाद ७१ आहे. पांड्याने आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९४ विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याची सर्वोत्तम कामगिरी १६ धावांत ४ विकेट्स आहे. (सर्व फोटो साभार- हार्दिक पांड्या इन्स्टाग्राम) हेही पाहा- प्रियदर्शिनी इंदलकरने ‘दशावतार’च्या प्रमोशनसाठी परिधान केली साडी, सिद्धार्थ मेननबरोबर काढले रोमँटिक
नव्या लूकमध्ये आशिया कप गाजवणार हार्दिक पांड्या, जाणून घ्या लूकबद्दल सर्व काही…
हार्दिक पंड्याची नवीन हेअर स्टाईल: आशिया कपपूर्वी हार्दिक पंड्याने स्टायलिश लूक स्वीकारला आहे आणि तो खूपच आकर्षक दिसत आहे. त्याच्या नवीन लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Web Title: Hardik pandya new hair style before asia cup 2025 spl