-
विराट कोहलीने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आता भारतासाठी फक्त एकदिवसीय सामने खेळताना दिसणार आहे.
(फोटो- इंडियन एक्सप्रेस) -
कोहलीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आज आपण अशा ५ भारतीयांबद्दल सांगतो ज्यांनी कोहलीसोबत आंतरराष्ट्रीय सामने खेळले पण त्याच्याबरोबर कधीही फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. (Photo: Social Media)
-
युजवेंद्र चहल
स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल यांनी ९१ आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळले आहेत. मात्र, दोघांनीही कधीही एकत्र फलंदाजी केली नाही. ३५ वर्षीय चहल बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर आहे. त्याने ऑगस्ट २०२३ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. (Photo: Social Media) -
आशिष नेहरा
माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने कोहलीसोबत ५२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले पण दोघांनाही एकत्र फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. नेहराने २०१७ मध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. (Photo: Social Media) -
प्रवीण कुमार
५१ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकत्र खेळूनही कोहली आणि प्रवीण कुमार यांना कधीही एकत्र फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. माजी वेगवान गोलंदाज प्रवीणने २००७ मध्ये भारतासाठी पदार्पण केले आणि २०१२ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. (Photo: Social Media) -
मुनाफ पटेल
यादीतील चौथे नाव मुनाफ पटेलचे आहे, ज्याने कधीही कोहलीसोबत फलंदाजी केली नाही. माजी वेगवान गोलंदाज मुनाफ आणि कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकत्र ३६ सामने खेळले. तो शेवटचा २०११ मध्ये भारताकडून खेळला होता. मुनाफ २०११ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. (Photo: Social Media) -
मोहित शर्मा
वेगवान गोलंदाज मोहित शर्मा आणि कोहली यांनाही एकत्र फलंदाजी करता आली नाही. दोघांनीही भारतीय संघासाठी एकत्र २८ सामने खेळले. मोहितने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१५ मध्ये खेळला. त्याने २०१३ मध्ये भारतासाठी पदार्पण केले होते. (Photo: Social Media)
तब्बल ‘इतक्या’ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकत्र खेळले, पण किंग कोहलीबरोबर फलंदाजी करू शकले नाही ‘हे’ ५ भारतीय खेळाडू
या ५ खेळाडूंनी तब्बल ‘इतके’ सामने कोहलीबरोबर एकत्र खेळले, पण त्याच्याबरोबर फलंदाजीचा योग काही आला नाही…
Web Title: These five indian players never batted with virat kohli palayed even 51 to 91 international matches spl