-
मोहम्मद नबी, अफगाणिस्तान
मोहम्मद नबीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेथ ओव्हरमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. अफगाणिस्तानच्या या अनुभवी अष्टपैलू खेळाडूने आतापर्यंत डेथ ओव्हरमध्ये ६३३ चेंडूंचा सामना केला आहे आणि ७४ षटकार मारले आहेत. (Photo: X) -
डेव्हिड मिलर, दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलरनेही आतापर्यंत डेथ ओव्हर्समध्ये ७४ षटकार मारले आहेत. १६ ते २० षटकांच्या दरम्यान त्याने ७०८ चेंडूंचा सामना केला. २०२५ च्या आशिया कपमध्ये नबीने मिलरच्या विक्रमाशी बरोबरी केली. दरम्यान, अफगाणिस्तान गट टप्प्यातच बाहेर पडला आहे. (Photo: X) -
हार्दिक पांड्या, भारत
भारताचा शक्तिशाली अष्टपैलू हार्दिक पांड्या या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत टी-२० मध्ये ७१ षटकार मारले आहेत, तर डेथ ओव्हर्समध्ये ६२० चेंडूंचा सामना केला आहे. (Photo: X) -
दरम्यान हार्दिक आता इतिहास घडवण्याच्या मार्गावर आहे. तो सध्या सुरू असलेल्या आशिया कपमध्ये चार षटकार मारून नबी आणि मिलरला मागे टाकून नंबर १ फलंदाज बनणार आहे. (Photo: BCCI)
-
नजीबुल्लाह झाद्रान, अफगाणिस्तान
अफगाणिस्तानचा फलंदाज नजीबुल्लाह झद्रानने डेथ ओव्हर्समध्ये ७० षटकार मारले आहेत. १६ ते २० ओव्हर्समध्ये त्याने ५५० चेंडूंचा सामना केला आहे. जून २०२४ पासून नजीबुल्लाहने एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. (Photo: X) -
विराट कोहली, भारत
या यादीत ५ व्या क्रमांकावर महान फलंदाज विराट कोहली आहे. त्याने डेथ ओव्हर्समध्ये ५३६ चेंडूत ५० षटकार मारले आहेत. २०२४ चा टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर कोहलीने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. (Photo: X)
T20I मधले सिक्सर किंग! शेवटच्या षटकांत तुफान फटकेबाजी करणारे टॉप ५ खेळाडू, आशिया चषकात हार्दिक पांड्या घडवणार इतिहास…
टी-२० क्रिकेटमध्ये, शेवटच्या षटकांमध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस पडत असतो. फलंदाजीसाठी आलेल्या संघावर १६ ते २० षटकांच्या दरम्यान धावगती वाढवण्याचा प्रचंड दबाव असतो. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टॉप पाच खेळाडू कोण आहेत ते जाणून घेऊयात. भारताचा हार्दिक पांड्या यामध्ये लवकरच इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
Web Title: Top 5 players with most sixes in t20i death overs hardik pandya creating this record soon spl