-
अभिषेक शर्माने आशिया कपमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
-
त्याने ओमान, पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध तीन स्फोटक अर्धशतके झळकावली आहेत, तब्बल २०८ च्या स्ट्राईक रेटसह त्याने सर्व सामन्यांवर वर्चस्व गाजवले आहे.
-
स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत अभिषेक शर्माच आघाडीवर आहे, त्याने आतापर्यंत १७ षटकार ठोकले आहेत.
-
त्याच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीव्यतिरिक्त, शर्मा आयपीएलमधूनही लक्षणीय कमाई करतो, तो सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करतो, सनरायझर्सने त्याला २०२५ मध्ये १४ कोटींमध्ये कायम ठेवले.
-
अभिषेक शर्माचे बीसीसीआयबरोबर ग्रेड सी सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट आहे, ज्यामधून तो दरवर्षी १ कोटी रुपये कमावतो, त्याचबरोबर ब्रँड एंडोर्समेंटमधूनही अधिकचे उत्पन्न मिळवतो.
-
अमृतसरच्या एका आलिशान भागात त्याचा आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असा प्रशस्त बंगला आहे, ज्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याची सांगितले जाते.
-
आलिशान जीवनशैली जगणाऱ्या अभिषेक शर्माकडे अनेक महागड्या गाड्या आणि घड्याळं आहेत, मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती सुमारे ३० कोटी रुपये इतकी आहे.
-
त्याच्याकडे टोयोटा इनोव्हा, बीएमडब्ल्यू ३२०डी, फॉर्च्युनर, महिंद्रा थार आणि महिंद्रा एक्सयूव्ही ३एक्सओ यासारख्या महागड्या कार्सचं कलेक्शन आहे.
-
(सर्व फोटो साभार- अभिषेक शर्मा इन्स्टाग्राम)
हेही पाहा- T20I मधले सिक्सर किंग! शेवटच्या षटकांत तुफान फटकेबाजी करणारे टॉप ५ खेळाडू, आशिया चषकात हार्दिक पांड्या घडवणार इतिहास…
आलिशान घर ते कार्स कलेक्शन; आशिया चषक गाजवणाऱ्या अभिषेक शर्माकडे किती आहे संपत्ती?
Abhishek Sharma, Asia Cup : यंदाच्या आशिया चषकामध्ये अभिषेक शर्मा टीम इंडियाचा भाग आहे. आशिया कपमध्ये त्याच्या धमाकेदार खेळीने अभिषेकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आज आपण अभिषेकच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊयात…
Web Title: Asia cup star abhishek sharma net worth home cars and records information in marathi spl