-
रोहित शर्माचा वनडे संघाचा कर्णधार म्हणून असलेला सुवर्णकाळ संपला असून शुबमन गिल आता संघाचा नवा कर्णधार असेल.
-
वनडेमध्ये ५० अधिक सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्त्व करणाऱ्या ७ कर्णधारांमध्ये रोहित शर्माचा समावेश आहे. त्याची विजयाची टक्केवारी ७५ टक्के राहिली आहे. जी जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक टक्केवारी आहे.
-
रोहितनंतर शुबमन गिल हा संघाचा २८वा वनडे कर्णधार आहे. भारताचं वनडेमध्ये नेतृत्त्व करणाऱ्या कर्णधारांची यादी पाहूया.
-
अजित वाडेकर हे वनडे संघाचे १९७४ मध्ये पहिले कर्णधार होते. त्यानंतर एस व्यंकटराघवन (१९७५-७९), बिशन सिंग बेदी (१९७५-७८), सुनील गावस्कर (१९८०-८५)
-
गुंडप्पा विश्वनाथ (१९८०), कपिल देव (१९८२-९२), सय्यद किरमानी (१९८३), मोहिंदर अमरनाथ (१९८४), रवी शास्त्री (१९८६-९१)
-
दिलीप वेंगसरकर (९१८७-८८), क्रिष्णमचारी श्रीकांत (१९८९), मोहम्मद अझरूद्दीन (१९८९-९९), सचिन तेंडुलकर (१९९६-९९)
-
अजय जडेजा (१९९८-९९), सौरव गांगुली (१९९९-२००५), राहुल द्रविड (२०००-०७), अनिल कुंबळे (२००२), वीरेंद्र सेहवाग (२००३-२०११)
-
महेंद्रसिंग धोनी (२००७-१८), सुरेश रैना – (२०१०-१४), गौतम गंभीर (२०१०-११), विराट कोहली (२०१३-२१)
-
अजिंक्य रहाणे (२०१५), रोहित शर्मा (२०१७-२०२५), शिखर धवन (२०२१-२२), केएल राहुल (२०२२-२३), हार्दिक पंड्या (२०२३), शुबमन गिल (२०२५) (वरील सर्व फोटो सौजन्य – लोकसत्ता संग्रहित फोटो)
५१ वर्षांचा वनडे इतिहास, १०००हून अधिक सामने…, अजित वाडेकर ते रोहित शर्मापर्यंत कोणकोण होते भारताचे कर्णधार? पाहा संपूर्ण यादी
India ODI Captains: रोहित शर्मानंतर आता शुबमन गिल भारताच्या वनडे संघाचा कर्णधार असणार आहे. भारताच्या ५१ वर्षांच्या वनडे इतिहासात कोणकोण भारताचे कर्णधार राहिले आहेत, पाहूया यादी.
Web Title: India odi captains full list rohit sharma shubman gill virat kohli ms dhoni ajit wadekar bdg