-
सुनील गावस्कर-रोहन गावस्कर: भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्करांच्या लेकाने भारताकडून वनडे क्रिकेट सामने खेळले आहेत.
-
लाला अमरनाथ-मोहिंदर अमरनाथ: लाला अमरनाथ हे भारताचे दिग्गज क्रिकेटपटू होते. तर त्यांचा मुलगा मोहिंदर अमरनाथ यांनी १९८३च्या विश्वचषकात महत्त्वाचा खेळाडू होते आणि भारतीय संघाचा उपकर्णधारही होते. तर त्यांचा मुलगा सुरिंदरही भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळले.
-
रॉजर बिन्नी-स्टुअर्ट बिन्नी: रॉजर बिन्नी हे यशस्वी अष्टपैलू खेळाडू राहिले आहेत, तर त्यांचा लेकही भारतासाठी क्रिकेट खेळला आहे.
-
योगराज सिंग – युवराज सिंग: योगराज सिंग हे एक आक्रमक क्रिकेटपटू म्हणून ओळखले जात असत. तर त्यांचा लेक भारताचा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याची क्रिकेट कारकीर्द खूपच यशस्वी राहिली. युवराज २००७च्या टी-२० विश्वचषक आणि २०११ च्या वनडे वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग होता.
-
विजय मांजरेकर – संजय मांजरेकर: या पितापुत्राच्या जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्त्व केलं.
-
शिवनारायण चंद्रपॉल – तेजनारायण चंद्रपॉल: वेस्ट इंडिजसाठी दोन्ही पितापुत्रांनी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.
-
ख्रिस ब्रॉड- स्टुअर्ट ब्रॉड: ख्रिस ब्रॉड हे इंग्लंड संघाचे माजी कर्णधार होते, नंतर त्यांना रेफरी म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यांचा लेक स्टुअर्ट ब्रॉडनेही उत्कृष्ट गोलंदाज म्हणून इंग्लंडसाठी चांगली कामगिरी केली.
-
पीटर पोलॉक – शॉन पोलॉक: दक्षिण आफ्रिकेच्या या पिता पुत्राच्या जोडीने आपल्या कारकिर्दीत संघाच्या यशासाठी कायमचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.
-
जेफ मार्श, शॉन आणि मिचेल मार्श: ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मार्श कुटुंबाने मोठी छाप पाडली आहे. जेफ मार्श यांच्यानंतर त्यांच्या दोन्ही लेकांनी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.
क्रिकेटपटू बाप-लेक! ९ प्रसिद्ध खेळाडूंनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गाजवलं आहे क्रिकेटचं मैदान; ५ आहेत भारतीय जोड्या
Father Son Cricketer Duo: भारत आणि वेस्ट इंडिजच्या यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटीत वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू शिवनारायण चंद्रपॉल यांचा मुलगा तेजनारायण खेळत आहे. याप्रमाणे कोणकोणत्या बापलेकाच्या जोड्यांनी एकत्र क्रिकेट खेळलं आहे, जाणून घेऊया.
Web Title: Which are famous father son duos who play cricket in world cricket sunil rohan gavaskar yograj yuvraj singh see list in marathi bdg