-
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान दुसरा सामना २३ ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान कोण आहेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना ४१ वनडे सामन्यांमध्ये ४५ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या नावे २६ वनडे सामन्यांमध्ये ४२ गडी बाद करण्याची नोंद आहे. (फोटो-इंडियन एक्सप्रेस)
-
भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना ४५ सामन्यांमध्ये ३९ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरच्या नावे ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना २१ वनडे सामन्यांमध्ये ३६ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
जवागल श्रीनाथ यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे क्रिकेटमध्ये २९ सामन्यांमध्ये ३३ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज
India vs Australia: कोण आहेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज? जाणून घ्या.
Web Title: Ind vs aus indian bowlers with most wickets against australia in odi cricket amd