-
ऑस्ट्रेलियात खेळताना सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने आतापर्यंत खेळलेल्या ६३ डावात ५४ षटकार मारले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावे ऑस्ट्रेलियात खेळताना ८० डावात ३७ षटकार मारण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा माजी फलंदाज एमएस धोनी या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. धोनीने ऑस्ट्रेलियात खेळताना ५४ डावात २३ षटकार खेचले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारतीय संघातील सर्वात विश्वासू खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण करणारा केएल राहुलने ऑस्ट्रेलियात खेळताना ३४ डावात २० षटकार खेचले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा माजी फलंदाज शिखर धवन या यादीत पाचव्या स्थानी आहे.धवनने ऑस्ट्रेलियात खेळताना ३५ षटकात १८ षटकार मारले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारतीय संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या यादीत सहाव्या स्थानी आहे. हार्दिकने ११ डावात १८ षटकार मारले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
IND vs AUS: ऑस्ट्रेलियात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज
Most Sixes By Indian Batters In Australia: कोण आहेत ऑस्ट्रेलियात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज? जाणून घ्या.
Web Title: Most sixes by indian batters in australia ind vs aus series rohit sharma virat kohli kl rahul ms dhoni amd