Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. t20 world cup photos
  4. team india captain rohit sharma created a series of records in the t20 world cup 2024 match against ireland vbm

PHOTOS : विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ‘हिटमॅनने’ पाडला विक्रमांचा पाऊस, तब्बल ‘इतक्या’ रेकॉर्ड्सची केली नोंद, पाहा यादी

Rohit Sharma’s latest records List : टी-२० विश्वचषकाच्या ८ व्या सामन्यात टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली विजयी सलामी दिले. टीम इंडियाने आयर्लंडविरुद्ध ८ विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात हिटमॅनने अनेक विक्रमांना गवसनी घातली.

June 6, 2024 17:03 IST
Follow Us
  • Rohit Sharma's latest records List
    1/9

    टी-२० विश्वचषक २०२४ मधील आठव्या सामन्यात रोहित शर्माने आयर्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावलून रिटायर्ड हर्ट झाला. त्याने ३७ चेंडूचा सामना करताना ४ चौकार ३ षटकारांच्या मदतीने ५२ धावा करत विक्रमांची रांग लावली.

  • 2/9

    रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. आतापर्यंत जगातील इतर कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही.

  • 3/9

    रोहित शर्माने १४४ डावात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४००० धावांचा टप्पा गाठला आहे. हा टप्पा गाठणारा तो विराट कोहली आणि बाबर आझमनंतरचा तिसरा फलंदाज आहे.

  • 4/9

    आयर्लंडविरुद्ध खेळायला उतरताच रोहित टी-२० विश्वचषकाचा सलग नववा हंगाम खेळणारा पहिला खेळाडू ठरला. त्याच्यानंतर या यादीत बांगलादेशच्या शाकिब अल हसनचा क्रमांक लागतो.

  • 5/9

    रोहित शर्माने टी-२० वर्ल्ड कपमध्ये १००० धावा करण्याचा विक्रमही केला आहे. यापूर्वी भारतीय खेळाडू विराट कोहली आणि श्रीलंकेचा खेळाडू महेला जयवर्धने यांनी ही कामगिरी केली होती.

  • 6/9

    रोहितने आता टी-२० क्रिकेटमध्ये धावा करण्याच्या बाबतीत बाबर आझमला मागे टाकले आहे. रोहितच्या टी-२० क्रिकेटमध्ये मध्ये ४०२६ धावा आहेत, तर बाबर आझमच्या ४०२३ धावा आहेत.

  • 7/9

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक भारतीय संघाच्या विजयाचा भाग असणार रोहित शर्मा (३००*) तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या पुढे विराट कोहली (३१४*) आणि सचिन तेंडुलकर (३०७) आहे.

  • 8/9

    रोहित शर्मा (२८६०) आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. या यादीत विराट कोहली (२९००) आणि बाबर आझम (३०८१) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

  • 9/9

    रोहित शर्माने कर्णधार म्हणून धोनीला मागे टाकत टी-२० मध्ये भारताला सर्वाधिक सामने जिंकून दिले आहेत. भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली ४१ (७२) सामने आणि रोहितच्या नेतृत्त्वाखाली ४२ (५५) सामने जिंकलेत. (Photo-BCCI X)

TOPICS
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ICC T20 World Cup 2024टी-२० वर्ल्ड कप २०२४T20 World Cup 2024टीम इंडियाTeam Indiaरोहित शर्माRohit Sharma

Web Title: Team india captain rohit sharma created a series of records in the t20 world cup 2024 match against ireland vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.