Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. t20 world cup photos
  4. who is saurabh netravalkar mumbai born play for ind u19 wc 20210 ranji trophy and 1st usa bowler take 5 wicket vbm

USA vs PAK : कोण आहे सुपर ओव्हरचा हिरो सौरभ नेत्रावळकर? ज्याने पाकिस्तान संघाला पाजले पाणी, जाणून घ्या

Who is Saurabh Netravalkar : टी-२० विश्वचषक २०२४ च्या ११ व्या सामन्यात यजमान अमेरिकेने मोनांक पटेलच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानविरुद्ध मोठा अपसेट घडवून आणला. अमेरिकन संघाने सुपर ओव्हरमध्ये सौरभ नेत्रावळकरच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानचा ५ धावांनी धुव्वा उडवला.

June 7, 2024 20:18 IST
Follow Us
  • Who is American Cricketer Saurabh Netravalkar
    1/9

    टी-२० विश्वचषक २०२४ मधील अमेरिका विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी, सौरभ नेत्रावलकरचा जन्म मुंबईत झाला हे क्वचितच कोणाला माहित असेल. इतकेच नाही तर सौरभने आयसीसी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

  • 2/9

    सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला विजयासाठी १९ धावांची गरज होती. पण सौरभ नेत्रावळकरने सुपर ओव्हरमध्ये १३ धावा दिल्या आणि इफ्तिखार अहमदची विकेटही घेतली.

  • 3/9

    डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१ रोजी मुंबईत झाला. त्याने २०१३ मध्ये कर्नाटकविरुद्धच्या रणजी सामन्यात मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

  • 4/9

    २०१० मध्ये आयसीसी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तो केएल राहुल, मयंक अग्रवाल, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट आणि संदीप शर्मा यांचा माजी सहकारी आहे.

  • 5/9

    भारतातील वाढत्या स्पर्धेमुळे, त्याला आपली प्रतिभा दाखवण्याची जास्त संधी मिळाली नाही. यानंतर २०१५ मध्ये सौरभ यूएसएला गेला आणि तब्बल ९ वर्षांनी त्याने इतिहास रचला.

  • 6/9

    सौरभ नेत्रावळकरची पहिल्यांदा २०१८ मध्ये यूएस संघात निवड झाली होती आणि फेब्रुवारी २०१९ मध्ये त्याची कर्णधारपदी निवड झाली. सौरभने २०२२ मध्ये झिम्बाब्वे येथे आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक ग्लोबल क्वालिफायर बी स्पर्धेत भाग घेतला.

  • 7/9

    सौरभने त्या स्पर्धेतील एका सामन्यात ५ विकेट्स घेतल्या. टी-२० क्रिकेटमधील एका सामन्याक ५ विकेट घेणारा तो पहिला अमेरिकन खेळाडू ठरला.

  • 8/9

    सौरभ हा एक प्रतिभावान सॉफ्टवेअर अभियंता देखील आहे. तो ओरॅकलमध्ये प्रधान अभियंता म्हणून काम करतो. मात्र, त्याचा पगार किती आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • 9/9

    ३२ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरची एकूण संपत्ती जवळपास दोन मिलीयन डॉलर इतकी आहे. यामध्ये त्याच्या पगार, जाहिराती, करार आणि गुंतवणूक यांचा समावेश आहे. (Photo Source – Saurabh Netravalkar Insta )

TOPICS
अमेरिकाAmericaआयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ICC T20 World Cup 2024क्रिकेट न्यूजCricket Newsटी-२० वर्ल्ड कप २०२४T20 World Cup 2024पाकिस्तान क्रिकेट टीमPakistan Cricket Team

Web Title: Who is saurabh netravalkar mumbai born play for ind u19 wc 20210 ranji trophy and 1st usa bowler take 5 wicket vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.