-
आज सकाळी दहा वाजल्यापासून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान घेतलं जात आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएकडून द्रौपदी मूर्मू तर विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
-
भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे खासदार मनमोहन सिंग यांनी देखील मतदान केलं आहे. मतदानासाठी ते व्हीलचेअरवरून आले होते.
-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केलं आहे.
-
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ येथे मतदानाचा हक्क बजावला आहे. योगी यांनी उत्तर प्रदेश विधान भवनाच्या टीळक हॉलमध्ये जाऊन मतदान केलं आहे.
-
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केलं आहे.
-
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीही नव्या राष्ट्रपतीसाठी आपलं मतं दिलं आहे.
-
केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी आज सकाळी संसदेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केलं आहे.
-
बॉलिवूड अभिनेती आणि भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी देखील सोमवारी सकाळी संसदेत मतदानाचा हक्क बजावला आहे. (फोटो सौजन्य- एएनआय आणि सोशल मीडिया)
Presidential Polls 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी, CM एकनाथ शिंदे यांच्यासह ‘या’ बड्या राजकीय नेत्यांनी केलं मतदान, पाहा Photos
आज सकाळी दहा वाजल्यापासून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान घेतलं जात आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएकडून द्रौपदी मूर्मू तर विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
Web Title: Pm narendra cm eknath shinde and other political leader cast their vote presidential election rmm