• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. gaganyaan 1 to mangalyaan 2 isro will launch 6 space missions in 2024 jshd import asc

गगनयान १ ते मंगळयान २; २०२४ मध्ये ISRO च्या सहा अवकाश मोहिमा, भारत कोणकोणत्या ग्रहांवर तिरंगा फडकवणार

इस्रोने २०२३ मध्ये चांद्रयान ३ आणि आदित्य एल१ सह अनेक यशस्वी अवकाश मोहिमा राबवल्या. भारताची ही अंतराळ संशोधन संस्था पुढच्या वर्षीदेखील अनेक अवकाश मोहिमा हाती घेणार आहे.

Updated: December 26, 2023 23:49 IST
Follow Us
  • ISRO
    1/7

    भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) २०२३ मध्ये ७ यशस्वी मोहिमा राबवल्यानंतर इस्रो आता नवीन वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये अनेक मोठमोठ्या मोहिमा हाती घेणार आहे. (Photo Source: ISRO)

  • 2/7

    NISAR
    इस्रो नासाच्या मदतीने NISAR (नासा इसरो सिंथेटिक अपर्चर राडार) मिशन कार्यान्वित करण्याच्या तयारीत आहे. डुअल-फ्रिक्वेंसी सिंथेटिक अपर्चर रडार उपग्रह प्रक्षेपित करणे हे या मोहिमेचं उद्दीष्ट आहे. जानेवारी २०२४ मध्ये हे मिशन सुरू होईल. (Photo Source: ISRO)

  • 3/7

    INSAT 3DS3DS
    इनसॅट 3DS पुढील वर्षी जानेवारी २०२४ मध्ये लॉन्च होणार आहे. INSAT-3DS GSLV-MK-II द्वारे लाँच केलं जाईल. हा उपग्रह आपत्ती व्यवस्थापन आणि हवामानाची सखोल माहिती देण्याचं काम करेल. (Photo Source: ISRO)

  • 4/7

    Gaganyaan 1
    गगनयान १ पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. ही उड्डाणाची एक चाचणी असेल. भविष्यात मानसाला अंतराळात पाठवता येईल का? याची चाचपणी या मोहिमेद्वारे केली जाणार आहे. (Photo Source: ISRO)

  • 5/7

    Mangalyaan-2 (MOM 2)
    इस्रो त्यांच्या दुसऱ्या मार्स ऑर्बिटर मिशनची (MOM 2) ची तयारी करत आहे. MOM 1 च्या यशानंतर, इस्रो आता मंगळाचे वातावरण, पृष्ठभाग आणि हवामानाचा अभ्यास करण्यासाठी MOM 2 ची तयारी करत आहे. या मोहिमेची लॉन्चिंग डेट अद्याप ठरलेली नाही, परंतु २०२४ च्या मध्यात ही मोहीम हाती घेतली जाऊ शकते. (Photo Source: ISRO)

  • 6/7

    X-ray Polarimeter Satellite
    एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह २०२३ मध्ये पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करण्याची योजना आहे. वैश्विक क्ष-किरणांच्या ध्रुवीकरणाची तपासणी करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. (Photo Source: ISRO)

  • 7/7

    Shukrayaan-1 (Venus Orbiter Mission) : भारत पहिल्यांदाच व्हीनस ऑर्बिटर मिशन अंतर्गत शुक्र ग्रहाच्या कक्षेत अंतराळ यान प्रक्षेपित करण्याची योजना आखत आहे. डिसेंबर २०२४ मध्ये हे यान प्रक्षेपित केले जाऊ शकते. (All Photos Source: ISRO/ Website, YouTube, Twitter)

TOPICS
आदित्य एल१ADITYA L1इस्रोISROचांद्रयान ३chandrayaan 3

Web Title: Gaganyaan 1 to mangalyaan 2 isro will launch 6 space missions in 2024 jshd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.