• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. five top cars below 10 lakh price with 6 airbags in india auto news in gujarati as ieghd import pdb

किंमत ४.२३ लाख अन् ६ एअरबॅग्स; देशातील बाजारपेठेत ‘या’ ५ कार्सचा बोलबाला, ही यादा एकदा पाहाच!

Top 5 Best Budget Cars with 6 Airbags: भारतातील ६ एअरबॅग्ज असलेल्या कार्सची यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले आहोत, ज्या १० लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये खरेदी करता येतात.

Updated: April 22, 2025 17:51 IST
Follow Us
  • car safety features
    1/6

    आज आम्ही तुमच्यासाठी दहा लाखांपेक्षाही कमी किंमत असलेल्या आणि स्टॅंडर्ड म्हणून सहा एअरबॅगसह असलेल्या पाच कारची यादी घेऊन आलो आहोत.

  • 2/6

    मारुती सुझुकी अल्टो के१०
    मारुती सुझुकी अल्टो के१० ही भारतातील सर्वात लोकप्रिय कारपैकी एक आहे. ही हॅचबॅक, जी आता लॉर्ड अल्टो म्हणून प्रसिद्ध आहे, परवडणारी किंमत आणि ६ एअरबॅग्जने ही कार सुसज्ज आहे. मारुती सुझुकी अल्टो के१० ची एक्स-शोरूम किंमत ४.२३ लाख रुपये ते ६.०९ लाख रुपये आहे.
    (छायाचित्र: फायनान्शियल एक्सप्रेस)

  • 3/6

    मारुती सुझुकी इको
    मारुती सुझुकी इको ही देखील एक लोकप्रिय प्रवासी कार आहे. ३-सीटर लाइनसह उपलब्ध असलेली सर्वात स्वस्त मारुती सुझुकी इको आता ६ एअरबॅग्जने सुसज्ज आहे. ही कार सीएनजीमध्ये देखील उपलब्ध आहे. मारुती सुझुकी इकोची किंमत ५.४४ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टाॅप व्हेरिएंट मॉडेलसाठी ६.७० लाख रुपयांपर्यंत जाते. (छायाचित्र: फायनान्शियल एक्सप्रेस)

  • 4/6

    मारुती सुझुकी सेलेरियो
    मारुती सुझुकीने फेब्रुवारीमध्ये सेलेरियोला अपग्रेड दिले. सेलेरियो कार आता ६ एअरबॅग्जसह येते. मारुती सुझुकी सेलेरियोची एक्स-शोरूम किंमत ५.६४ लाख ते ७.३७ लाख रुपयांपर्यंत आहे. (छायाचित्र: फायनान्शियल एक्सप्रेस)

  • 5/6

    मारुती सुझुकी वॅगन आर
    २०२४-२५ या आर्थिक वर्षात मारुती सुझुकी वॅगनआर ही सर्वाधिक विक्री होणारी कार होती आणि या हॅचबॅकची मागणी सतत वाढत आहे. ही कार आता सहा एअरबॅग्जसह येते. मारुती सुझुकी वॅगनआरची एक्स-शोरूम किंमत ५.६५ लाख ते ७.३६ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
    (छायाचित्र: फायनान्शियल एक्सप्रेस)

  • 6/6

    ह्युंदाई ग्रँड आय१० निओस
    या यादीत स्थान मिळवणारी ह्युंदाई ग्रँड आय१० निओस ही हॅचबॅक ३० हून अधिक सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. ज्यात ६ एअरबॅग्ज, ड्रायव्हर रीअर व्ह्यू मॉनिटर (DVRM), इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), वाहन स्थिरता व्यवस्थापन (VSM), हिल असिस्ट नियंत्रण इत्यादींचा समावेश आहे. ह्युंदाई ग्रँड आय१० निओस कारची एक्स-शोरूम किंमत ५.९८ लाख ते ८.३८ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. (छायाचित्र: फायनान्शियल एक्सप्रेस)

TOPICS
ऑटोAutoऑटो न्यूजAuto NewsकारCar

Web Title: Five top cars below 10 lakh price with 6 airbags in india auto news in gujarati as ieghd import pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.