• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photos lonavla maval monsoon trips tourist take photos by risking lives kjp 91 scsg

Photos: लोणावळ्यात फोटो, सेल्फीसाठी जीव धोक्यात टाकून स्टंटबाजी; २०१७ साली येथेच झालेला एकाचा मृत्यू

२०१७ साली याच ठिकाणी इंजिनिअरच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणारा तरुण स्टंटबाजी करत असताना वाहून गेला होता. मात्र त्यानंतरही येथे येणाऱ्या पर्यटकांनी धडा घेतलेला नाही

June 28, 2021 10:30 IST
Follow Us
  • Lonavla Tourist
    1/7

    लोणावळा, मावळसारख्या ठिकाणी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जून महिन्यात दमदार पाऊस झाल्याने धबधबे, नद्या ओसंडून वाहत आहेत. हा सर्व परिसरस सध्या डोंगर-दऱ्या हिरवळीने नटलेला आहे. हेच दृश्य आणि वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी विविध ठिकाणी शेकडो पर्यटक करोनासंदर्भातील निर्बंध झुगारून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. (सर्व सौजन्य : कृष्णा पांचाळ)

  • 2/7

    याच दरम्यान, अनेक पर्यटक फोटोंसाठी, सेल्फीसाठी आपला जीव धोक्यात घालत असल्याचं चित्रही दिसत आहे. ओसंडून वाहणाऱ्या पाण्याजवळ जाऊन जीवघेणा सेल्फी काढण्याचा मोह अनेक पर्यटकांना आवरता येत नाही.

  • 3/7

    लोणावळा, मावळ या परिसरात मोठ्या प्रमाणावर छोटे मोठे धबधबे आणि नद्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पर्यटकांची वर्दळ या ठिकाणी वाढली आहे. करोना नियम धुडकावून पर्यटक फिरत असल्याचं चित्र असून पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलीस बघ्यांची भूमिका घेत आहेत.

  • 4/7

    मावळ परिसरात असणाऱ्या कुंडमळा येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असून येथील ओसंडून वाहणाऱ्या पाण्यासोबत सेल्फी काढत असल्याचं चित्र आहे. परंतु, हे त्यांच्या जीवावर बेतू शकतं.

  • 5/7

    कुंडमळा येथे रांजण खळगे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. ओसंडून वाहणाऱ्या पाण्यासोबत तरुण, तरुणी अगदी पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊन जीवघेणा सेल्फी काढत जीव धोक्यात घालत आहेत. दरम्यान, अनेक पालक आपल्या मुलाला घेऊन रांजण खळगे पाहण्यासाठी नदीच्याकडे बसल्याचं तर, काही तरुण मंडळी आपल्या मैत्रिणीसोबत थेट पाण्यात जाऊन खेळत असल्याचं चित्र येथे सामान्य गोष्ट आहे. याठिकाणी पिंपरी-चिंचवड पोलिसांचं दुर्लक्ष होत आहे.

  • 6/7

    लोणावळ्यातील टायगर पाईंट, लायन्स पॉईंट येथे देखील हुल्लडबाजीमुळे अनेकांचे जीव गेलेत. काही घटनांमध्ये तर सेल्फीच्या मोहापायी जीव गेल्याची उदाहरणे आहेत. असं असतानाही लोकांनी या पूर्वीच्या घटनांमधून धडा घेतल्याचं चित्र दिसत नाही.

  • 7/7

    २०१७ ला स्टंटबाजी जीवावर बेतली होती : तीन ते चार वर्षांपूर्वी कुंडमळ्यात इंजिनिअरच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणारा तरुण स्टंटबाजी करत असताना वाहून गेला होता. यात, त्याचा मृत्यू झाला होता. स्टंटबाजी चांगलीच जीवावर बेतली होती. असं असताना अनेक पर्यटक हलगर्जीपणा करत जीव धोक्यात घालत आहेत. अतुल पाटील हा नदीच्या दुसऱ्या बाजूवरून उडी घेत होता, तेव्हा त्याच्या तोल गेला आणि थेट पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. त्याचा हा स्टंट मोबाईलच्या कॅमेऱ्यात छायाचित्राद्वारे मित्रांनी टिपला होता. पर्यटकांनी पर्यटनस्थळी अशी हुल्लडबाजी करु नये असं अनेकदा प्रशासनाकडून सांगण्यात येतं, मात्र पर्यटक याकडे दुर्लक्ष करतात.

TOPICS
करोना विषाणूCoronavirusपर्यटनTourismमान्सून अपडेटMonsoon Update

Web Title: Photos lonavla maval monsoon trips tourist take photos by risking lives kjp scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.