• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. maharashtra chief minister eknath shinde ashadhi ekadashi 2022 mahapuja paithani shela yeola lord vitthal design photos sdn

Photos: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी खास पैठणी शेला; आषाढी एकादशीला देण्यात येणार भेट

जगप्रसिद्ध असलेली येवल्याची पैठणी ही सर्वदूर आजही प्रसिद्ध आहे.

July 9, 2022 14:42 IST
Follow Us
  • CM Eknath Shinde Ashadhi Ekadashi 2022
    1/15

    आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे रविवार १० जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे.

  • 2/15

    या महापूजेसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

  • 3/15

    आषाढी एकादशीनिमित्त येवल्यातील पैठणी कारागीर संतोष जेजुरकर यांनी एक खास शेला तयार केला आहे.

  • 4/15

    संतोष यांनी पैठणीच्या शेल्यावर विठ्ठलाचा फोटो हाताच्या साह्याने विणकाम करून काढला आहे.

  • 5/15

    या कारागिराला याकरता एक महिन्याचा कालावधी लागला आहे.

  • 6/15

    हा शेला सचिन आहेर मित्र मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट देण्यात येणार आहे.

  • 7/15

    जगप्रसिद्ध असलेली येवल्याची पैठणी ही सर्वदूर आजही प्रसिद्ध आहे.

  • 8/15

    येथील कारागीर नेहमीच आपली कला आपल्या हाताच्या साह्याने पैठणी साडीवर साकारत असतात.

  • 9/15

    येवला तालुक्यातील पारेगाव या ग्रामीण भागातील संतोष जेजुरकर यांनी आपल्या हाताच्या साह्याने पैठणीच्या शेल्यावर विठुरायाची प्रतिमा साकारली आहे.

  • 10/15

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशी निमित्त भेट देण्यात येणार आहे.

  • 11/15

    रविवार १० जुलै रोजी मध्यरात्री अडीच ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापुजेसाठी उपस्थित राहतील.

  • 12/15

    पहाटे साडेपाच वाजता विठ्ठल मंदिर परिसरातील इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडेल.

  • 13/15

    पहाटे पवाणेसहा वाजता नदी घाटाच्या लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्री उपस्थित असतील असं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

  • 14/15

    सकाळी सव्वा अकरा वाजता शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्हयातील ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहतील.

  • 15/15

    सकाळी पावणेबारा वाजता मुख्यमंत्री पंचायत समिती पंढरपूर येथे ‘स्वच्छता दिंडी’ समारोपामध्ये सहभागी होणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता ते पक्ष मेळाव्यास उपस्थित राहतील. (फोटो सौजन्य : RNO)

TOPICS
आषाढी वारी २०२५Ashadhi Wari २०२५एकनाथ शिंदेEknath ShindeपंढरपूरPandharpurमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Maharashtra chief minister eknath shinde ashadhi ekadashi 2022 mahapuja paithani shela yeola lord vitthal design photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.