• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. ganesh chaturthi 2022 ganpati bappa morya aagman sohala devotees lord ganesha mandal lalbaug parel mumbai photos sdn

Photos: आनंद पोटात माझ्या मावना! गणरायाच्या आमगमानाने दोन वर्षांनंतर मुंबापुरीच्या उत्साहाला उधाण; हे फोटो एकदा पाहाच

गोपाळकाल्यानंतर भाविकांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून सुट्टीचे निमित्त साधून रविवारी (२१ ऑगस्ट) मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्ती वाजतगाजत मंडपस्थळी आणल्या.

Updated: August 23, 2022 12:44 IST
Follow Us
  • Ganpati Bappa Aagman 21 August 2022 Photos
    1/15

    Ganeshotsav 2022 : दहा दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी सर्वत्र लगबग सुरु आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 2/15

    मुंबईतील ठिकठिकाणच्या गणेश कार्यशाळांमध्ये साकारलेल्या गणेशमूर्ती रविवारी (२१ ऑगस्ट) सार्वजनिक मंडळांनी वाजतगाजत मंडपस्थळी आणल्या. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 3/15

    फटाक्यांची आतशबाजी, ढोल-ताशाच्या गजरात गणरायाचे आगमन झाल्याने वातावरण भक्तीमय झाले. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 4/15

    मिरवणुकांमुळे अधिक संख्येने मूर्तीकार्यशाळा असलेल्या लालबाग, परळ आदी भागांतील वाहतुकीचे पोलिसांना सकाळपासूनच नियोजन करावे लागले. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 5/15

    करोनामुळे भाविकांना गेली दोन वर्षे कडक निर्बंधांत गणेशोत्सव साजरा करावा लागला होता. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)

  • 6/15

    मात्र यंदा संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे राज्य सरकारने सर्वच निर्बंध हटविले आहेत. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)

  • 7/15

    परिणामी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)

  • 8/15

    मुंबईमधील लालबाग, परळ आणि परिसरातील मूर्ती कार्यशाळांमध्ये साकारलेल्या उंच गणेशमूर्ती रविवारी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपस्थळी रवाना झाल्या. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 9/15

    मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यानिमित्ताने फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशाच्या गजरात, गुलालाची उधळण केली. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)

  • 10/15

    ३१ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव सुरू होत आहे. (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 11/15

    त्यामुळे मुंबईतील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी २१ ऑगस्ट रोजी सुट्टीचा मुहूर्त साधत मूर्ती मंडपस्थळी आणल्या. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 12/15

    गणेश आगमनाच्या मिरवणुकांमुळे लालबाग, परळ आणि परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होती. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 13/15

    त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)

  • 14/15

    लालबाग, परळ भागात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन येथील वाहतून अन्य मार्गाने वळविण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 15/15

    मुंबईमध्ये रविवारी मोठ्या संख्येने गणेश आगमनाच्या मिरवणुका निघण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
गणेश उत्सव २०२३Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मुंबई न्यूजMumbai News

Web Title: Ganesh chaturthi 2022 ganpati bappa morya aagman sohala devotees lord ganesha mandal lalbaug parel mumbai photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.