• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photos of the traditional ganesh visarjan procession in pune begins msr

PHOTOS : पुण्यातील पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुकीस जल्लोषात सुरुवात; कलाकारांचेही ढोल वादन

Pune Ganesh Visarjan 2022 : राजकीय नेतेमंडळींचा देखील मिरवणुकीत सहभाग; पाहा मिरवणुकीचे आकर्षक फोटो फक्त एकाच क्लिकवर

Updated: September 9, 2022 18:26 IST
Follow Us
  • जवळपास दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केल्यानंतर, आज राज्यभरातील भक्तगण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. (फोटो सौजन्य - सागर कासार, अरुल होरिझन, सुजित ताबंडे, ओश्विन काधव)
    1/68

    जवळपास दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केल्यानंतर, आज राज्यभरातील भक्तगण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. (फोटो सौजन्य – सागर कासार, अरुल होरिझन, सुजित ताबंडे, ओश्विन काधव)

  • 2/68

    मुंबई, पुणे या शहरांमध्ये प्रसिद्ध मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीस जल्लोषात प्रारंभ झालेला आहे.

  • 3/68

    पुण्यातील पारंपरिक मिरवणुक देखील लक्ष्मी रोडवरून निघालेली आहे.

  • 4/68

    या मिरवणुकीत मानाचे गणपतींसह अन्य विविध मंडळाचे गणपती सहभागी होत आहेत.

  • 5/68

    पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट म्हणजे या मिरवणुकीत कलाकारांनी देखील ढोल वादन केले.

  • 6/68

    अभिनेता सिद्धार्थ जाधव याने देखील ढोल वादनाचा आनंद लुटला.

  • 7/68

    याशिवाय अभिनेत्री श्रुती मराठे ही देखील ढोल वाजवताना दिसली.

  • 8/68

    शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरवणुकीत सहभागी होत मानाच्या गणपतीची पालखी खांद्यावर घेतली.

  • 9/68

    मिरवणूक मार्गावर विविध सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत.

  • 10/68

    रांगोळीतून विविध प्रबोधनात्मक संदेश देण्यात आला होता.

  • 11/68

    शिवाय, मानवी देखावे सादर केले जात आहेत.

  • 12/68

    यावेळी मिरवणुकीत महिला पोलीस कर्मचारीने लाठी फिरवून दाखवली.

  • 13/68

    एकीकडे कर्तव्य बजावत असताना दुसरीकडे पांरपारिक कला देखील सादर केली.

  • 14/68

    यावेळी उपस्थितांनी या महिला पोलीस कर्मचारीच्या कौशल्यास दाद दिली.

  • 15/68

    मिरवणुकीत विविध भव्य असे पुतळे देखील वाहनावरून नेले जात होते.

  • 16/68

    या भव्य पुतळ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले.

  • 17/68

    लाडक्या बाप्पाला निरोप देताना गणेशभक्त गुलालाची उधळण करत होते.

  • 18/68

    विविध वाहनांवर सुंदर अशी सजावट करून गणरायाची मूर्ती विसर्जनासाठी नेली जात होती.

  • 19/68

    यावेळी विसर्जन मार्गात गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी दुतर्फा गर्दी केली होती.

  • 20/68

    मिरवणुकीत सहभागी झालेले भक्त अक्षरशा गुलालाने माखून गेले होते.

  • 21/68

    ढोल ताशांच्या गजरात गणरायाचा जयघोष करत भक्तांनी ठेका धरला होता.

  • 22/68

    पारंपरिक वाद्य चौघडा वाजवताना एक युवती

  • 23/68

    एक वाहनावर चौघडा या पारंपरिक वाद्यांचा संच बसवण्यात आला होता.

  • 24/68

    लहान मुलांनी विसर्जन मिरवणूकीत सहभाग नोंदवत पावली सादर केली.

  • 25/68

    मानाचा चौथा तुळशी बाग गणपती मंडळाची मिरवणूक

  • 26/68

    मिरवणूक मार्गावर भव्य अशी रांगोळी काढण्यात आली होती.

  • 27/68

    गणरायाला निरोप देताना फुलांची उधळण केली जात होती.

  • 28/68

    पारंपारिक पालखीत बसवून मानाच्या गणपतीची मिरवणूक निघाली होती.

  • 29/68

    ढोल पथक आणि भक्तांच्या गर्दीने विसर्जन मिरवणुकीचा मार्ग अक्षरश: दुतर्फा भरला होता.

  • 30/68

    मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत महिला कार्यकर्त्यांचा देखील विशेष वेशभुषेत सहभाग होता.

  • 31/68

    शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील यंदा पुण्यातील विसर्जन मिरवणुकीस हजेरी लावली.

  • 32/68

    ढोल पथकांनी उत्कृष्ट सादरीकरण करत नागरिकांची मने जिंकली.

  • 33/68

    मानाचा तिसरा गणपती गुरूजी तालीम मंडळाची मिरवणूक

  • 34/68

    श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या रात्री होणाऱ्या मिरवणुकीची तयारी सुरू झाली.

  • 35/68

    श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती विसर्जन मिरवणूक तयारी करताना मंडळाचे कार्यकर्ते

  • 36/68

    मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरी गणेश मंडळाचा रथ मिरवणुकीसाठी सज्ज

  • 37/68

    मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

  • 38/68

    पालखीत बसून गणराया त्यांच्या गावी निघाल्यानंतर त्याला निरोप देण्यासाठी कार्यकर्ते फेटे बांधून मिरवणुकीत सहभागी झाले होते.

  • 39/68

    तांबडी जोगेश्वरी मंडळासमोर समर्थ पथकाने शिवकालीन साहसी क्रीडा प्रकार सादर केले.

  • 40/68

    यामधील लाठीकाठीच्या प्रात्याक्षिकाने उपस्थितांची मने जिंकली

  • 41/68

    मुलींनी देखील पारंपारिक वेशभुषा करून ढाल हाती घेत तलवारबाजीचे प्रात्याक्षिक सादर केले

  • 42/68

    हे साहसी प्रात्याक्षिक पाहताना सर्वांना ते सादर करणाऱ्यांचे कौतुक वाटत होते.

  • 43/68

    आदित्य ठाकरे यांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत मानाच्या गणपतीचे दर्शन घेतले.

  • 44/68

    मिरवणुकीच्या अंतिम टप्प्यात अलका टॉकीज चौकात भव्य अशी रांगोळी काढण्यात आली होती.

  • 45/68

    या भव्य रांगोळ्या सभोवताली नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.

  • 46/68

    पारंपारिक पालखीत बसून मानाचा पहिला कसबा गणपती सर्वप्रथम विसर्जनासाठी पोहचला.

  • 47/68

    मानाचा पहिला कसबा गणपतीचे पारंपारिक पद्धतीने विसर्जन झाले

  • 48/68

    अलका टॉकीज नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती आणि गणरायाचा जयघोष सुरू होता.

  • 49/68

    विसर्जन मिरवणुकीत परदेशी विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

  • 50/68

    केसरीवाडा गणपती बेलबाग चौकातून मार्गस्थ.

  • 51/68

    केसरीवाडा गणपती मिरवणुकीत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तिरंगा ध्वज हाती घेत जल्लोष करण्यात आला

  • 52/68

    मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकातून मार्गस्थ

  • 53/68

    मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची मिरवणूक

  • 54/68

    विसर्जन मिरवणूक टिळक चौकात दाखल

  • 55/68

    पुण्यातील प्रसिद्ध बेलगबाग चौकामधील दृश्य

  • 56/68

    सत्यवीर मित्र मंडळ ट्रस्टचा गणपती, हिराबाग चौकातील दृश्य

  • 57/68

    विसर्जन मिरवणुकीत महिलांना फेर धरत आनंद लुटला

  • 58/68

    विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजवणाऱ्यांनी रंगत आणली

  • 59/68

    पारंपरिक पालखीत बसून गणपती बाप्पा निघाले गावाला

  • 60/68

    गणेश मंडळांच्या ढोल पथकांनी भरून गेलेला रस्ता

  • 61/68

    विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्यांची गर्दी इतकी होती की माणसं एकमेकांना चिकटून उभी होती

  • 62/68

    विसर्जन मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्वत: पोलीस आयुक्त देखील बंदोबस्ताच्या ठिकाणांची पाहणी करत होते.

  • 63/68

    एक उत्साही ताशा वादक मित्राच्या खांद्यावर उभा राहून ताशा वाजवताना

  • 64/68

    अनेक ठिकाणचे रस्ते बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले होते.

  • 65/68

    मिरवणुक मार्गावर विविध मंडळांची वाहनं एकापाठोपाठ शिस्तीत पुढे जात होती.

  • 66/68

    परदेशी पाहुण्यांना देखील गणेश विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटता आला

  • 67/68

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार हे देखील मिरवणुकीत सहभागी झाले होते.

  • 68/68

    वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ प्रथेप्रमाणे शुक्रवारी (९ सप्टेंबर) मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा चौकातून झाला.

TOPICS
गणेश उत्सव २०२३Ganpati Festivalगणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025पुणे न्यूजPune News

Web Title: Photos of the traditional ganesh visarjan procession in pune begins msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.