• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. central minister nitin gadkari inspected the mumbai goa highway work through a helicopter declared a new deadline asj

PHOTOS : नितीन गडकरी यांनी हेलिकॉप्टरमधून केली मुंबई-गोवा महामार्गाची पहाणी, सांगितली नवी डेडलाईन…

Updated: March 30, 2023 14:41 IST
Follow Us
  • पनवेल येथील खारपाडा गावाजवळ पनवेल ते कासू या ४२ किलोमीटर रत्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय भुपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
    1/12

    पनवेल येथील खारपाडा गावाजवळ पनवेल ते कासू या ४२ किलोमीटर रत्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय भुपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

  • 2/12

    मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाचे हे चौथे भूमिपूजन ठरले आहे.

  • 3/12

    भूमिपूजन झाल्यावर रत्नागिरीला जातांना हेलिकॉप्टरमधून मुंबई-गोवा महामार्गाची पहाणी करत आढावाही घेतला.

  • 4/12

    या महामार्गासाठी ४० वेगवेगळ्या बैठका झाल्या, यंदा वर्षअखेरपर्यंत ८४ किलोमीटर कॉंक्रीटीकरणाचे काम पुर्ण होईल असे आश्वासन यावेळी गडकरी यांनी दिले.

  • 5/12

    कोकणाच्या रखडलेल्या महामार्गावर पुस्तक लिहीले जाऊ शकते अशी उपरोधिक टीकाही यावेळी गडकरी यांनी कार्यक्रमादरम्यान केली.

  • 6/12

    रखडलेल्या कामाचे दु:ख असून या महामार्गाच्या बांधकामाविषयी काही बोलण्यासारखे आहे, मात्र काही सांगण्यासारखे नाही अशी भावनाही यावेळी गडकरी यांनी व्यक्त केली.

  • 7/12

    राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची सूरुवात १३ वर्षांपुर्वी केली होती.

  • 8/12

    महामार्गातील भूसंपादन,पर्यावरण विभागाची परवानगी आणि महामार्ग बांधणा-या ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे या महामार्गाचे काम रखडले.

  • 9/12

    या महामार्गाच्या कामाची एकूण १० पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रकल्पाची सुधारित किंमत १५,५६६ कोटी रुपये असून ३५६ किमी लांबीच्या महामार्गावरील २५० किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

  • 10/12

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन पॅकेजेस ९९% काम पूर्ण झाले आहे.

  • 11/12

    रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ५ पॅकेजेस असून यापैकी २ पॅकेजेसचे ९२% व ९८% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. तर दोन पॅकेजेससाठी नवीन कंत्राटदाराची नेमणूक करून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत.

  • 12/12

    रायगड जिल्ह्यातील तीन पॅकेजेसपैकी दोन पॅकेजेसचे ९३% व ८२% काम पूर्ण झाले आहे. एका पॅकेजचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे. ( सर्व छायाचित्रांसाठी सौजन्य – @nitin_gadkari )

TOPICS
गोवाGoaनितीन गडकरीNitin GadkariमुंबईMumbaiरायगडRaigadहायवेHighway

Web Title: Central minister nitin gadkari inspected the mumbai goa highway work through a helicopter declared a new deadline asj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.