Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. rulling parties ready for monsoon session triple engine government tastes tea party sgk

पावसाळी अधिवेशनासाठी सत्ताधारी सज्ज, ट्रिपल इंजिन सरकारकडून ‘चहापाना’चा आस्वाद

Updated: July 16, 2023 18:27 IST
Follow Us
  • विधिमंडळाचे पावसाळी अधिवशेन उद्यापासून (१७ जुलै) सुरू होत आहे.
    1/10

    विधिमंडळाचे पावसाळी अधिवशेन उद्यापासून (१७ जुलै) सुरू होत आहे.

  • 2/10

    पावसाळी अधिवेशाच्या १५ दिवस आधीच राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याने विरोधी बाकावरील अजित पवार सत्तेत सामील झाले आहेत.

  • 3/10

    शिवेसनेच्या फुटीनंतर झालेल्या पावसाळी, हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशात अजित पवारांनी महाविकास आघाडीच्या वतीने खिंड लढवली होती.

  • 4/10

    परंतु, यावेळेस अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने विरोधकांच्या बाजूने बोलणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

  • 5/10

    दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यानुसार, सह्याद्री अतिथीगृह येथे आजही चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु, या कार्यक्रमावर नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे.

  • 6/10

    विरोधी पक्ष या कार्यक्रमाला आले नसले तरीही शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपातील आमदारांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली.

  • 7/10

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, आशिष शेलार, धनजंय मुंडे, दादा भुसे, मनिषा कायंदे या फोटोंमध्ये दिसत आहेत.

  • 8/10

    राज्यातील महागाई, शेतकरी आत्महत्या, कायदा सुव्यवस्था या प्रश्नांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात उभे ठाकणार आहेत.

  • 9/10

    ठाकरे गटाचे १५ आमदार, शरद पवार गटाचे १० ते १५ आमदार आणि काँग्रेसचे ४५ आमदार हे शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपाविरोधात लढणार आहेत. यासाठी रणनीती आखण्याकरता आज महाविकास आघाडीची बैठकही पार पडली.

  • 10/10

    शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवारांचंही सहाय्य लाभल्याने सरकार निश्चिंत असल्याचं म्हटलं जातंय. तर, या पावसाळी अधिवेशनात सर्वांत मोठी कसोटी विरोधकांसमोर असल्याचं मत राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. या पावसाळी अधिवेशनातून सर्वसामान्य नागरिकांना काय मिळतंय याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeकाँग्रेसCongressपावसाळी अधिवेशनMonsoon Sessionभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsशिवसेनाShiv Sena

Web Title: Rulling parties ready for monsoon session triple engine government tastes tea party sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.