-

केंद्रीय स्मृती इराणी यांनी दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर ASK ME ANYTHING हा खेळ खेळला होता. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांची त्यांनी सडेतोड आणि दिलखुलास उत्तरे दिली आहेत.
-
ASK ME ANYTHING या टूलचा वापर अद्याप कोणत्याही राजकीय नेत्याने केला नव्हता. परंतु स्मृती इराणी यांनी याचा पुरेपुर फायदा करून घेतला. यावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला की राजकीय नेत्याला हा खेळ खेळताना कधी पाहिलं नाही. त्यावर स्मृती इराणी म्हणाल्या की, प्रत्येक वेळी पहिली वेळ असतेच.
-
तुम्ही व्यावसायिक आणि कौटुंबिक आयुष्य कसे सांभाळता असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता, त्यावर त्या म्हणाल्या की, आपण आपल्या अपेक्षा सांभाळल्या की वेळही सांभाळून घेते.
-
तुमचा आवडता चित्रपट कोणता? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, DDLG, QSQT, सत्ते पे सत्ता, अग्निपथ, खुदा गवाह, चांदणी, युज्वल सस्पेक्ट्स, दि गॉडफादर आदी चित्रपट आवडतात.
-
स्मृती इराणी यांच्या आजी मराठी आहेत. त्यामुळे तुम्हाला पुरणपोळी आवडते का? असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी मराठीतून लय आवडते असं उत्तर दिलं.
-
“एवढ्या भाषा कुठून शिकलात?” असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्या म्हणाल्या की, “आजोबा पंजाबी, आजी मराठी, आईची आई आसामी, आईचे वडील बंगाली, नवरा गुजराती आहेत. तर, इंग्रजी भाषा शाळेतून शिकले.”
-
तुमचं लग्न तुमच्या मैत्रिणीच्या पतीशी झालंय का? असा खोचक प्रश्न एका नेटिझनने विचारला. त्यावर स्मृती इराणी यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. स्मृती इराणी म्हणाल्या, “नाही. मोना या माझ्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या आहेत. त्यामुळे त्या माझ्या ‘बचपन की सहेली’ कशा असतील? ती राजकारणी नाही. त्यामुळे तिला यात खेचू नका. माझ्याशी भांडा, माझ्याशी वाद घाला, माझी बदनामी करा पण राजकारणाशी काहीही संबंध नसलेल्या नागरिकाला तुमच्यासोबत गटारात ओढू नका. ती आदरास पात्र आहे.”
-
गेल्या अनेक दिवसांपासून MWCD मध्ये इंटर्नशीप मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तिथे नियुक्त होण्यासाठी काय सल्ला द्याल, असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
नियुक्त होण्यासाठी असलेली प्रक्रिया डावलून नेत्यांच्या माध्यमांतून नियुक्त होण्याची पद्धत वाईट आहे, असं स्मृती इराणी म्हणाल्या. -
स्मृती इराणींना मुंबई की दिल्ली आवडते? असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी दोन्ही शहरं आवडत असल्याचं सांगितलं.
“पुरणपोळी आवडते का?” इन्स्टाग्रामवरील प्रश्नावर स्मृती इराणींचं मराठीतून उत्तर
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी Ask Me Anything असा प्रश्न त्यांच्या इस्टाग्राम स्टोरीवर विचारला होता. त्यावर त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. अनेक प्रश्नांची त्यांनी सडेतोड आणि हटके उत्तरे दिली आहेत.
Web Title: Do you like puranapoli smriti iranis answer to a question on instagram in marathi sgk