-
मकर संक्रांती २०२४ च्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान करण्याची परंपरा आहे. याशिवाय या दिवशी गायींची सेवा करण्याचीही पद्धत असते.
-
हिंदू परंपरा आणि श्रद्धेनुसार गायीला मातेचा दर्जा आहे.
-
या खास सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना, त्यांच्या निवासस्थानी गायींची सेवा करताना पाहू शकतो.
-
यावेळी पंतप्रधान मोदींनी, गायींना चारा खायला घातला.
-
गायींची सेवा करताना , पंतप्रधान मोदींचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या छायाचित्रांमध्ये पंतप्रधान मोदी, स्वत:च्या हाताने एक-एक करून गायींना चारा देत असल्याचे तुम्ही पाहू शकता.
-
अनेक गायीही पंतप्रधान मोदींभोवती फिरताना दिसत आहेत.
-
पंतप्रधान मोदी हेदेखील या गायींना सांभाळताना दिसतात.
-
छायाचित्रांमध्ये दिसणाऱ्या या गायींचे पालन हे पीएमओमध्येच करण्यात आले आहे.
-
या गायी, सामान्य गायींपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांची जात आणि रचना देखील सामान्य गायींपेक्षा वेगळी आहे.
-
दक्षिण भारतात विकसित झालेल्या पुंगनूर जातीच्या या गायी आहेत.
-
ही जगातील सर्वात लहान गाय असल्याचे सांगितले जाते. त्यांची उंची साधारणतः ३ ते ५ फूट असते. (फोटो स्रोत: पीटीआय)
(हे पण वाचा: तासांचे अंतर आता मिनिटांत होणार पूर्ण, जाणून घ्या मुंबईतील अटल सेतूचे वैशिष्ट्ये)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गाईला चारा खाऊ घालून, अनोख्या शैलीत साजरा केला मकर संक्रांतीचा सण
मकर संक्रांत २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी गायींना चारा दिला आणि त्यांची देखभाल केली.
Web Title: Prime minister narendra modi feeds cows at his residence on makar sankranti jshd import dha