-
काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आज मुंबईमध्ये स्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने प्रयत्न केले गेले. (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)
-
दरम्यान, विक्रोळी पूर्व येथे झाड कोसळून झालेल्या घटनेत २६ वर्षीय तरुण जखमी झाला होता. घटनेनंतर त्याला गोदरेज रुग्णालयात नेण्यात आले जिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)
-
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे महापुरासारखी परिस्थिती झाली होती, त्यानंतर महानगरपालिकेकडून आता मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)
-
विक्रोळीजवळील पूर्व द्रुतगती महामार्गावरील ड्रेनेज साफ करण्यासाठी कामगार परिश्रमपूर्वक काम करताना दिसले. (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)
-
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)
-
त्यामुळे आता सायन उड्डाणपुलावर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)
-
रस्त्याचे खराब झालेले भाग भरण्यासाठी रेडी-मिक्स डांबर यांचे मिश्रण घेऊन कर्मचारी घटनास्थळी काम करत आहेत. (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)
-
काल मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे, वरळी-वांद्रे-अंधेरी सी लिंक बांधकाम साइटपासून दोन मोठे लोखंडी डेक सेक्शन, सवेरा हाऊसिंग सोसायटीजवळील माहीम बीचवर वाहून आले आणि नंतर किनाऱ्यावर आले. (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)
-
यातील एक अजूनही समुद्रकिनाऱ्यावरील वाळूमध्ये गाडलेला आहे. तथापि, दुसरा भाग यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला आणि आज दुपारी बांधकाम साइटवर परत नेण्यात आला. (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)
-
पुणे
दरम्यान आज पुण्यात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. -
मंगळवारी उंड्री पार्क येथील बिशप्स शाळेजवळील संरक्षक भिंत कोसळली.
-
येथील नळाचे पाणी दुकाने आणि घरांमध्ये शिरले. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)
-
हे सर्व फोटो लोकसत्ताच्या छायाचित्रकारांनी टिपले आहेत. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)
-
दरम्यान, महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस बरसेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)
-
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा व पुण्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर, सिंधुदुर्ग, आहिल्यानगर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत पुढील २४ तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)
-
(एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन) हेही पाहा- १७ दिवसांआधी लोकार्पण आणि पहिल्याच मोसमी पावसात मुंबईतलं मेट्रो स्थानक जलमय, पाहा व्हायरल फोटो
Photos: मुसळधार पावसानंतर मुंबई मनपा प्रशासनाकडून आज स्वच्छता व दुरुस्तीची कामे
रस्त्याचे खराब झालेले भाग भरण्यासाठी रेडी-मिक्स डांबर यांचे मिश्रण घेऊन कर्मचारी घटनास्थळी काम करत आहेत.
Web Title: Mumbai municipal corporation is now carrying out a large scale cleaning and repair campaign see todays photos