• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. shivsena vardhapan din 2025 dcm eknath shinde criticizes uddhav thackeray at shiv sena rally in mumbai gkt

Eknath Shinde : “मी डॉक्टर नाही, पण ऑपरेशन्स…”, एकनाथ शिंदेंची शिवसेना मेळाव्यात टोलेबाजी; उद्धव ठाकरेंना केलं लक्ष्य!

शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन मेळावा मुंबईत वरळी येथे पार पडला. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

June 20, 2025 09:19 IST
Follow Us
  • Eknath Shinde
    1/10

    शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन मेळावा मुंबईत वरळी येथे पार पडला. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार उपनेते, जिल्हाप्रमुख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Photo source- Sankhadeep Banerjee)

  • 2/10

    ‘युतीसाठी लाचार झालेत’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गट आणि मनसेतील संभाव्य युतीवर टीका केली.(Photo source- Sankhadeep Banerjee)

  • 3/10

    “देश जिंकला, महाराष्ट्र जिंकला आता मुंबई महापालिका जिंकून भगव्याची हॅट्ट्रिक करू”, असा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. (Photo source- Sankhadeep Banerjee)

  • 4/10

    ‘कोणत्याही परिस्थितीत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक आपण जिंकणार आहोत’, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.(Photo source- Sankhadeep Banerjee)

  • 5/10

    “हिंदुत्व आणि मराठी माणसांशी विश्वासघात केल्यानंतर आता ते युती करता का? युती करतात का? म्हणत उतावळे आणि लाचार झालेत”, असं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. (Photo source- Sankhadeep Banerjee)

  • 6/10

    “हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना तुरुंगामध्ये टाकतात, तुमच्या नाकर्तेपणामुळे मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला गेला”, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली. (Photo source- Sankhadeep Banerjee)

  • 7/10

    “बाळासाहेब ठाकरेंनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली, पण कधी विचार सोडले नाहीत. कधीही हिंदुत्व सोडलं नाही. पण त्यांचे वारसदार म्हणवणाऱ्यांनी लाचारी पत्करली”, असंही शिंदे म्हणाले.(Photo source- Sankhadeep Banerjee)

  • 8/10

    “माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही. पण सत्तेत असताना सर्वांना कस्पटासमान समजणाऱ्यांची आज काय अवस्था झाली?”, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली. (Photo source- Sankhadeep Banerjee)

  • 9/10

    “मी डॉक्टर नाही, पण छोटे-मोठे ऑपरेशन करतो”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी शिवसेना मेळाव्यात जोरदार टोलेबाजी करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. (Photo source- Sankhadeep Banerjee)

  • 10/10

    “बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे आणि सत्तेचा मोह व सत्तेसाठी लाचारी केल्यामुळे ही परिस्थिती आली”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. (Photo source- Sankhadeep Banerjee)

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath ShindeशिवसेनाShiv Senaशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)Shivsena UBT

Web Title: Shivsena vardhapan din 2025 dcm eknath shinde criticizes uddhav thackeray at shiv sena rally in mumbai gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.