-
यंदाच्या आषाढी एकादशीला काहीच दिवस शिल्लक आहेत. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर असलेल्या वारकऱ्यांचा मेळा आज (२२ जून) दिवे घाटात पोहोचला तेव्हाची ही छायाचित्रे आहेत. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
पुण्यातला मुक्काम आटोपून ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा अवघड असा दिवे घाट पार करून सासवडमध्ये दोन दिवसीय मुक्काम करणार आहे. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
जवळपास चार किलोमीटर लांबीच्या अवघड दिवे घाटात वारकऱ्यांनी माऊली माऊली असा महागजर केला. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
हरी ओम विठ्ठला, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली माऊली अशा अखंड नामघोषाने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने दिवे घाट लीलया पार केला. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या घोषात वारकऱ्यांनी वारीचा हा प्रवास सुरु केला आहे. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
मजलदरमजल करीत हा पालखी सोहळा आता सोपान काकांच्या सासवड नगरीत २ दिवस मुक्कामी राहणार आहे. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
हिरवळीने सजलेल्या दिवे घाटात आणि लाखो वैष्णवांच्या मांदियाळीत हरिनानामाच्या जयघोषात माऊलींची ही पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करत आहे. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
(एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन) हेही पाहा- सलमान खानला आहे ‘ब्रेन एन्युरिझम’ हा आजार; या ‘सायलेंट किलर’ आजाराची लक्षणे काय असतात? जाणून घ्या…
Photos : ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करत प्रचंड उत्साहात माऊलींची पालखी दिवेघाटात; वैष्णवांचा महामेळा सासवडच्या दिशेने…
हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमला दिवे घाट! संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी अवघड अशा दिवे घाटात पोहोचली तेव्हाचे दृश्य…
Web Title: Sant dnyaneshwar mauli palkhi dive ghat photos saswad pune spl